गणेशोत्सव पाहण्यासाठी येणार्या रसिक प्रेक्षकांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी अनुभवता यावी यासाठी उत्सवादरम्यान विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदाही गणेश मंडळांसह सोसायट्यांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार असून, महिलांसाठी खेळ पैठणीचा, विविध गेम शो, लावणीचे कार्यक्रम, रंगतदार स्पर्धा होणार असून, यासाठी कलाकारांकडे विचारणाही सुरू झाली आहे, तर काहींकडे कार्यक्रमांसाठी बुकिंगही झाले आहे. मुंबई, सातारा, कोल्हापूर, धुळे, नाशिक आदी जिल्ह्यांमध्ये पुण्यातील कलाकार सादरीकरण करणार आहेत. गणेशोत्सवाच्या एका कार्यक्रमासाठी 10 ते 20 हजार रुपयांपर्यंतचे मानधन कलाकारांना देण्यात येते.