डोनाल्ड ट्रम्पही माहीचे फॅन | पुढारी

डोनाल्ड ट्रम्पही माहीचे फॅन

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या महेंद्रसिंग धोनी सध्या अमेरिका दौर्‍यावर आहे. धोनीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये तो अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत दिसत आहे. या फोटोमध्ये माही आणि डोनाल्ड ट्रम्प हे गोल्फच्या मैदानावर दिसत आहेत. प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तानुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी धोनीसाठी एका सामन्याचे आयोजन केले होते. धोनी आणि ट्रम्प एका व्हिडीओमध्ये एकत्र खेळताना दिसत आहेत.

आयपीएल 2023 नंतर धोनी निवृत्त होणार, अशी चर्चा होती. मात्र, त्यावेळी त्याने तसा निर्णय जाहीर केला नव्हता. धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्याने त्याच्या तंदुरुस्तीबाबत प्रश्न आहेत. मात्र, निवृत्तीचा विषय काढला असता त्याने टी-20 लीगच्या नव्या हंगामाच्या लिलावाला अद्याप वेळ आहे. अशा परिस्थितीत याबाबतचा निर्णय त्याचवेळी घेतला जाईल, असे सांगितले. धोनी सध्या अमेरिकेमध्ये असून, तो अमेरिकन ओपन स्पर्धेवेळी उपांत्यपूर्व फेरीचा सामना पाहण्यासाठीही पोहोचला होता. हा सामना पुरुष एकेरीतील अव्वल खेळाडू कार्लोस अल्काराझ आणि अलेक्झँडर ज्वेरेव यांच्यामध्ये खेळवला गेला होता.

Back to top button