Unregistered Vehicles: बारामतीत विनाक्रमांक वाहनांचा सुळसुळाट; टिपर-डंपरवर कारवाईची नागरिकांची मागणी

राज्यमार्गावर नियमांची उघड पायमल्ली; आरटीओ आणि वाहतूक पोलिसांच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप
Unregistered Vehicles
Unregistered VehiclesPudhari
Published on
Updated on

बारामती: बारामती तालुक्यात सध्या क्रमांक असलेल्या वाहनांचा सुळसुळाट झाला आहे. कोणतीही ओळख पटविणारी क्रमांक प्लेट नसतानाही अनेक वाहने राज्यमार्गासह विविध रस्त्यांवर सर्रास धावत असून, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Unregistered Vehicles
Maharashtra Heavy Rain Alert: महाराष्ट्रात पुढील 48 तास अतिवृष्टीचा इशारा; जिल्हानिहाय अलर्ट एका क्लिकवर

विशेषतः टिपर, डंपर व जड वाहने विनाक्रमांक किंवा नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर धावत आहेत. अशा वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढला असून, वाहतूक नियमांची उघडपणे पायमल्ली होत असूनही बारामती आरटीओ विभाग यावर काहीही कारवाई करत नाही.

Unregistered Vehicles
Expired Soft Drinks: कर्वेनगरमध्ये हजारो मुदतबाह्य शीतपेयांच्या बाटल्या; कारवाईच्या भीतीने साठा फेकल्याचा संशय

गेल्या वर्षी बारामतीत टिपरच्या धडकेत वडील व मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही संबंधित यंत्रणांनी पुरेशी खबरदारी घेतली नसल्याचे दिसत आहे. एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल बारामतीकर उपस्थित करत आहेत.

Unregistered Vehicles
Kothrud Shastrinagar Crematorium Roof Leak: कोथरूड शास्त्रीनगर स्मशानभूमीत गळक्या छतामुळे नागरिक त्रस्त

राज्यमार्गावर तसेच तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवर शेकडो विनाक्रमांक वाहने फिरत असल्याचे चित्र असताना, प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) आणि वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत नाही.

Unregistered Vehicles
MTDC Tourism Occupancy 2025-26: एमटीडीसी निवासस्थानांची ऑक्युपन्सी जाहीर; उत्पन्न व पर्यटन वाढ

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर तातडीने मोहीम राबवून दंडात्मक कारवाई करावी, तसेच विनाक्रमांक, विनाकागदपत्रे आणि धोकादायक पद्धतीने धावणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करून नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news