Baramati Illegal Firearms: बारामतीत अवैध शस्त्रांविरोधात पोलिसांची धडक कारवाई; पाच गावठी पिस्तुले जप्त

दोन पिस्तुलांसह तिघांना अटक; शस्त्रांचे धागेदोरे शिरपूर आणि मध्य प्रदेशापर्यंत
Gun Firing
Gun FiringPudhari
Published on: 
Updated on: 

बारामती: बारामती शहर व परिसरात अवैध पिस्तुले बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली असून, विविध गुन्ह्यांच्या तपासादरम्यान ५ गावठी पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. दोन पिस्तुलांसह तिघांना अटक करण्यात आली असून, अन्य शस्त्रांबाबतचा तपास सुरू आहे.

Gun Firing
Omkar Sugarcane Rate: ओंकार शुगरकडून शेतकऱ्यांना प्रतिटन ३६०० रुपयांची पहिली उचल जमा

२२ ऑक्टोबर रोजी शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत आदित्य चंद्रकांत शेलार (रा. आमराई, बारामती) याच्याकडे १ पिस्तूल आणि जिवंत काडतुसे मिळून आले. त्याला शहरातील एका महाविद्यालय परिसरात ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील कार (एमएच-१२ यूके ००७२) मध्ये हे पिस्तूल व काडतुसे मिळून आले.

Gun Firing
Bhatghar Dam Backwater Road: भाटघर धरणाच्या बॅकवॉटरकडे जाणारा रस्ता रात्री बंद; बसरापूर ग्रामपंचायतीचा निर्णय

ही शस्त्रे त्याने मयूर विष्णू मोरे (रा. मेडद, ता. बारामती) याच्याकडून घेतल्याचे निष्पन्न झाल्याने त्यालाही अटक करण्यात आली. मोरेकडील अधिक तपासात त्याने ही शस्त्रे शिरपूर (जि. धुळे) येथून आणल्याची कबुली दिली. त्यानुसार शहर पोलिसांचे पथक तपासासाठी शिरपूर येथे गेले. तेथे तपास केला असता शांतीराम पावरा या आरोपीला दि. २३ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे आणखी २ पिस्तूल मिळून आले. त्याला तपासाकामी बारामतीत आणण्यात आले. त्यामुळे या कारवाईत एकूण ३ पिस्तुले मिळून आली.

Gun Firing
MSRTC Electric Bus Project Loss: इलेक्ट्रिक बसमुळे एसटीला १६८ कोटींचा तोटा; कर्मचाऱ्यांची अनुदानाची मागणी

धीरज रवींद्र पडकर हा तडीपार गुन्हेगार बारामतीत आला होता. त्याच्याकडे पोलिसांना एक पिस्तूल व जिवंत काडतुसे मिळून आली. त्याच्याविरोधात शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. २६ नोव्हेंबर रोजी मंगेश सुभाष मदने (रा. भीमरत्ननगर, कसबा, बारामती) याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी त्याला शहरातील निरा रस्ता परिसरातून ताब्यात घेतले.

Gun Firing
Fairness Cream Mercury Exposure: गोरेपणाच्या क्रीमचा कथित दुष्परिणाम; तरुण आयसीयूमध्ये, उपचारांवर १२ लाखांचा खर्च!

त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल व एक काडतूस आढळून आले. ही शस्त्रे मध्य प्रदेशातून आणली जात असल्याची माहिती तपासात पुढे आली आहेत. पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल, अप्पर अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक मनीषा ओमासे यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबवली गेली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.