Baramati ACB Bribery Case: बारामतीत सातबारा नोंदीसाठी 15 हजारांची लाच; एसीबीच्या सापळ्यात खासगी व्यक्ती

निंबूत येथे कारवाई; तलाठी व मंडल अधिकाऱ्यांच्या नावाने पैशांची मागणी केल्याचा आरोप
ACB Bribery Statistics
ACB Bribery StatisticsPudhari
Published on
Updated on

बारामती: प्लॉटची सात-' बारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी तलाठी व मंडल अधिकारी यांच्या नावाने पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या निंबुत (ता. बारामती ) येथील खासगी व्यक्ती विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला. सोमनाथ संपत महानवर (वय 35, रा. गडदरवाडी, ता. बारामती ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून तो तलाठी कार्यालयात कोतवालाचे काम करत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात महानवर याच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला.

ACB Bribery Statistics
Pune PMC Monsoon Preparation: पावसाळ्यापूर्व कामांसाठी पुणे महापालिकेचा 150 कोटींचा निधी; निविदा प्रक्रियेला वेळेचे आव्हान

एका तक्रारदाराने या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. शेती व्यवसाय करणाऱ्या तक्रारदाराचे निंबूत येथील गट क्रमांक 86 / 2 मध्ये सहा गुंठ्याचे प्लॉट आहेत. या प्लॉटची बारामतीच्या भूमी अभिलेख कार्यालय मार्फत मोजणी करून घेत फाळणीप्रमाणे क.जा.प. करण्यात आले होते भूमी अभिलेख विभागाने तक्रारदाराच्या फाळणी केलेल्या चार प्लॉटची सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी बारामतीच्या तहसीलदारांना पत्राद्वारे कळविले होते.

ACB Bribery Statistics
Pune Robotic Bariatric Surgery: पुण्यात पहिली रोबोटिक रिव्हिजनल बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया यशस्वी

त्याप्रमाणे तहसीलदारांनी नींबूत गावच्या तलाठी जयश्री तनपुरे यांना 11 फेब्रुवारी 2026 रोजी पत्रान्वये नोंद घेण्याचे आदेश दिले होते. दिनांक 18 फेब्रुवारी रोजी तक्रारदार यांनी निंबुत तेथील तलाठी कार्यालयात जात चौकशी केली. त्यावेळी तेथे हजर असलेल्या महानवर यांनी सातबारा नोंदीसाठी तलाठी जयश्री तनपुरे व मंडल अधिकारी मोहिते यांच्यासाठी एका प्लॉट साठी 5000 याप्रमाणे चार प्लॉटच्या नोंदीसाठी वीस हजार रुपयांची मागणी केली अशी तक्रार तक्रारदाराने दाखल केली होती.

ACB Bribery Statistics
Maharashtra Cooperation Department Promotion: सहकार विभागात पदोन्नतींची चाहूल; आठ अधिकाऱ्यांच्या अपर निबंधकपदी बढतीचा प्रस्ताव मंत्रालयात

एसीबी कडून 26 फेब्रुवारी रोजी लाच मागणी पडताळणी कारवाई करण्यात आली. त्यात महानगर याने तलाठी जयश्री तनपुरे यांच्यासाठी पाच ते सहा हजार रुपये, मंडल अधिकारी मोहिते यांच्यासाठी वीस हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले . दिनांक 3 मार्च रोजी तक्रारदार यांनी महानवर याच्याकडे कामाबाबत फोनवरून चौकशी केली असता त्याने सातबारा नोंद घेतल्याचे सांगून पेमेंट पाठवा असा व्हाट्सअप मेसेज पाठवला.

ACB Bribery Statistics
Pune Panchayat Samiti Chairman Election: पुणे जिल्ह्यात पंचायत समिती सभापती निवडीसाठी चुरस; ९ मार्चला मतदान

दिनांक 4 मार्च रोजी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास निरा बारामती रस्त्यावर इंडियन ऑइल पंप जवळ नींबूत खंडोबाची वाडी येथे एसीबी कडून सापळा कारवाई करण्यात आली. यावेळी 15 हजार रुपये लाच स्वीकारताना महानवर याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर महानवर हा कोतवाल नसून खाजगी इसम असल्याचे स्पष्ट झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news