Banana Price Increase: 'गरिबांचे फळ' महागले! केळी डझनाला ८० रुपये; उपवास, कार्यक्रमांमुळे मागणीत वाढ

किरकोळ दरात डझनामागे १० ते २० रुपयांची वाढ
Banana Price
Banana PricePudhari
Published on
Updated on

पुणे: 'गरिबांचे फळ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केळीने श्रावणातील वाढत्या मागणीमुळे चांगलाच भाव खाल्ला आहे. उपवास आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे केळीची मागणी वाढल्याने आठवडाभरात किरकोळ दरात डझनामागे १० ते २० रुपयांची वाढ झाली आहे.

मागील आठवड्यात ५० ते ६० रुपये डझनाने मिळणाऱ्या केळीसाठी आता ग्राहकांना ५० ते ८० रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागत आहेत.

श्रावण महिन्यात उपवास करणाऱ्यांकडून फळांना मोठी मागणी असते. त्यामध्ये सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे आणि सहज उपलब्ध होणारे फळ म्हणून केळीला विशेष पसंती मिळते. त्याशिवाय पूजा, धार्मिक कार्यक्रम आणि प्रसादासाठीही केळीचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.

Banana Price
Pune Sugar Stock: साखरेच्या साठेबाजीवर करडी नजर

त्यामुळे श्रावण सुरू झाल्यापासून केळीच्या मागणीत वाढ झाली आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील केळी बाजारात श्रावणात साधारणपणे दररोज १५ ते २० गाड्यांमधून केळीची आवक होते.

यंदा मात्र मागणी वाढल्याने आवकही वाढली असून, सध्या दररोज २० ते २५ गाड्यांमधून केळी बाजारात दाखल होत आहेत. सोलापूर येथून प्रामुख्याने केळीची आवक होत आहे.

Banana Price
Pudhari Majha Bappa: पर्यावरणपूरक बाप्पासाठी ‘माझा बाप्पा २०२६’; विद्यार्थी साकारणार पर्यावरणपूरक श्रीगणेशमूर्ती

सोलापूर भागातून येणाऱ्या केळीला दर्जानुसार घाऊक बाजारात प्रतिकिलो १२ ते १६ रुपये, तर १८ किलोच्या क्रेटला ३०० ते ४५० रुपये भाव मिळत आहे. बाजारात हलक्या प्रतींच्या केळींचे प्रमाण ६० टक्क्यांहून अधिक आहे.

चांगल्या प्रतीच्या केळीला ग्राहकांकडून अधिक मागणी असल्याने त्याचे दर तुलनेने तेजीत असल्याचे केळीचे व्यापारी अनिकेत वायकर यांनी सांगितले.

श्रावणात उपवास, पूजा आणि धार्मिक कार्यक्रमांमुळे केळीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. विशेषतः चांगल्या दर्जाच्या केळीला ग्राहकांची पसंती आहे. घाऊक बाजारात दर्जेदार केळीच्‍या १८ किलोचे दर ४०० ते ६०० रुपयांपर्यंत गेले आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत किरकोळ दरात डझनामागे १० ते २० रुपयांची वाढ झाली असून, दर्जानुसार केळीची विक्री ५० ते ८० रुपये डझनाने होत आहे. श्रावणातील मागणी कायम असेपर्यंत दर तेजीत राहण्याची शक्यता आहे.

- संजय काची, केळी विक्रेते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news