Maza bappa 2026: पर्यावरणपूरक बाप्पासाठी ‘माझा बाप्पा २०२६’; विद्यार्थी साकारणार पर्यावरणपूरक श्रीगणेशमूर्ती

Pudhari Maza Bappa Initiative: पुढारी माध्यम समूह, पुणे महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे उपक्रमाचे आयोजन; ३१ ऑगस्ट ते १० सप्टेंबरपर्यंत २० शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मूर्ती घडविण्याचे प्रशिक्षण
Maza Bappa 2026
Maza Bappa 2026 Pudhari
Published on
Updated on

Pudhari Maza Bappa Initiative 2026

पुणे: गणपती बाप्पा घडविण्याचा आनंद... आपल्या हातांनी साकारलेली मूर्ती आणि त्यातूनच पर्यावरण संवर्धनाचा संस्कार! गणेशोत्सवातील भक्तीला पर्यावरणाची जोड देत यंदाही शालेय विद्यार्थ्यांच्या हातूनच पर्यावरणपूरक बाप्पा साकारला जाणार आहे.

शाडूच्या मातीपासून श्रीगणेशाची मूर्ती घडविताना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी ‘माझा बाप्पा २०२६’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पुढारी माध्यम समूह, पुणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येणार असून, गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी शाडूच्या मातीची गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी, असा संदेश दिला जाणार आहे. हा उपक्रम

३१ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

Maza Bappa 2026
Pune Dengue Chikungunya Cases: पावसाळा संपतोय, तरी डास नियंत्रणाचे कर्मचारी कागदावरच

मागील वर्षी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर यंदाही पुण्यातील २० शाळांमध्ये कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. सॉलिटर ग्रुप, गोयल गंगा ग्रुप, बढेकर ग्रुप, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यापीठ पुणे, ऑटोट्रॉनिक्स इंजिनीअरिंग प्रा. लि, केले ग्रुप हे या उपक्रमाचे सहप्रायोजक आहेत.

विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळांमध्ये विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेली मूर्ती ते घरीही घेऊन जाऊ शकणार आहेत.

त्यामुळे बाप्पाची मूर्ती तयार करण्याचा आनंद घेतानाच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा विचारही त्यांच्या मनात रुजणार आहे. सोमवारी (दि. ३१) संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या उपक्रमाची शुभारंभ होणार आहे.

कात्रज-धनकवडी येथील भारती विद्यापीठाच्या न्‍यू इंग्लिश स्‍कूलमध्ये सकाळी अकरा वाजता पहिली कार्यशाळा होईल. त्यानंतर त्याच दिवशी पवार पब्लिक स्कूल (नांदेड सिटी) येथेही कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील काळात शहरातील विविध शाळांमध्ये अशाच कार्यशाळा घेण्यात येणार आहेत.

Maza Bappa 2026
Pune Traffic Management: वाहतुकीला आता ‘रिअल टाइम डेटा’चा आधार; पुणे शहरातील वाहतुकीवर पालिकेची राहणार डिजिटल नजर

लहान वयातच पर्यावरणपूरक सण साजरा करण्याची सवय लागावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. शाडूमातीच्या मूर्तीचे महत्त्व, पीओपीच्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण, मूर्तीचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन आणि गणेशोत्सवात पर्यावरणाची काळजी घेण्याच्या विविध उपायांची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.

विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला हा संदेश त्यांच्या पालकांपर्यंत आणि त्यातून कुटुंब, समाजापर्यंत पोहोचेल, अशी या उपक्रमामागची संकल्पना आहे.

विद्यार्थ्यांना घेता येणार प्रत्यक्ष मूर्ती साकारण्याचा अनुभव

‘माझा बाप्पा’ उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना केवळ पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व सांगितले जाणार नसून, त्यांच्या हातूनच पर्यावरणपूरक शाडूमातीची श्रीगणेशमूर्ती साकारली जाणार आहे.

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्टस्‌, त्यांचे शिल्पकार सुनील देशपांडे आणि त्यांचे विद्यार्थी यांचे विशेष सहकार्य या उपक्रमाला लाभले असून, येथील २० प्रशिक्षित शिल्पकार विद्यार्थ्यांना मूर्ती घडविण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष समजावून सांगतील.

मूर्ती तयार करण्यापासून ते तिच्या पर्यावरणपूरक विसर्जनापर्यंतची माहितीही विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. गणेशोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा सण असला तरी त्यासोबत पर्यावरणाचे भान जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

त्यामुळे ‘माझा बाप्पा २०२६’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश दिला जाणार आहे. पीओपीच्या मूर्तींमुळे विसर्जनानंतर जलप्रदूषणाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पीओपीला पर्याय म्हणून शाडूमातीच्या मूर्तींचा वापर करण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news