Balgandharva Tanpura: बालगंधर्वांचा ऐतिहासिक तानपुरा आता गोपाळ गायन समाजाच्या संग्रहात; शंभर वर्षांचा संगीत वारसा जपला जाणार

परांजपे कुटुंबीयांनी जपलेला अमूल्य ठेवा गुरुवारी संस्थेला सुपूर्द; संगीत परंपरेच्या संवर्धनाला नवी दिशा
Tanpura
TanpuraPudhari
Published on
Updated on

पुणे: मराठी संगीत रंगभूमीचे नटसम्राट नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व यांनी वापरलेला आणि परांजपे कुटुंबीयांनी जपलेला ऐतिहासिक तानपुरा आता गोपाळ गायन समाजाच्या संग्रहात दाखल होणार आहे. गुरुवारी (दि. २३) आयोजित केलेल्या उत्सवानिमित्त हा तानपुरा संस्थेला भेट देण्यात येणार आहे.

Tanpura
Pune Youth Congress Protest: नीट पेपरफुटीविरोधात पुण्यात युवक काँग्रेस आक्रमक; मोहोळ यांच्या कार्यालयाबाहेर भरपावसात आंदोलन

संगीत परंपरेचे जतन आणि संवर्धन करणारी गोपाळ गायन समाज संस्था शतकोत्तर वाटचाल करत आहे. यानिमित्ताने आयोजित उत्सवात बालगंधर्वांचा तानपुरा संस्थेला भेट देण्यात येणार आहे. टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या श्री गणेश सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या स्वरमैफलीच्या सुरुवातीला हा कार्यक्रम होईल, अशी माहिती तानपुरा जतन करणारे रेडिओलॉजिस्ट डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे यांनी दिली.

Tanpura
Pune Rainfall Update: पुण्यात पावसाचा जोर वाढला; २४ तासांत खडकवासला धरणसाखळीत ०.६४ टीएमसी पाण्याची भर

डॉ. रामचंद्र परांजपे यांच्या मातोश्री कै. कमलाबाई परांजपे या गोपाळ गायन समाजात पं. गोविंदराव देसाई यांच्याकडे शिकत होत्या. प्रत्येक गोकुळाष्टमीला उत्सवात त्यांचे गायन होत असे. सन १९२१ मध्ये मुंबईमध्ये संयुक्त मानापमानचा प्रयोग होता. त्यावेळी संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी आपला तानपुरा बालगंधर्वांना भेट दिला होता. बालगंधर्व पुण्यात आले की, कै. बापूसाहेब आणि कमलाबाई परांजपे यांच्याकडे राहत असत. तसेच, त्यांना नाट्यपदे शिकवत असत.

Tanpura
Shirur Leopard Attack: शिरूर तालुक्यात बिबट्याचा थरार! पाच वर्षांच्या चिमुकलीचा हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू

त्यावेळी केशवरावांचा तानपुरा बालगंधर्वांनी कै. बापूसाहेब आणि कमलाबाई परांजपे यांच्याकडे दिला होता. त्यांचे पुत्र डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे यांनी तो जतन केला आहे. हाच ऐतिहासिक ठेवा गोपाळ गायन समाजाला भेट म्हणून देण्यात येणार आहे. शंभरहून अधिक वर्षे उलटून गेली तरी देखील आजही तो तानपुरा उत्तम स्थितीत आहे, असे गोपाळ गायन समाजाचे डॉ. विकास कशाळकर यांनी सांगितले. पं. गोविंदराव देसाई हे संगीतोद्धारक पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे पट्टशिष्य. गुरूंच्या आदेशानुसार त्यांनी पुण्यामध्ये संगीताच्या प्रसाराचे कार्य सुरू केले.

Tanpura
Akshar Wari: संत तुकारामांचा भक्तिमार्ग : भक्ती आणि कर्माच्या संगमातून चित्तशुद्धीचा विज्ञाननिष्ठ संदेश

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रेरणेने त्यांनी १९२६ साली गोपाळ गायन समाजाची स्थापना केली. स्वतःचा संगीत अभ्यासक्रम सुरू केला. अशा गोपाळ गायन समाजच्या शतकोत्तर उत्सवाची सुरुवात कै. कमलाबाई परांजपे यांच्या स्मरणार्थ आयोजित ''रंगबहार'' या नाट्यगीतांच्या कार्यक्रमाने होणार आहे. सुरेश साखवळकर, बकुळ पंडित, केदार केळकर, अस्मिता चिंचाळकर, अभिनेत्री गात, रवींद्र कुलकर्णी आणि संजय गोगटे (ऑर्गन), केदार कुलकर्णी (तबला) यांचा सहभाग यामध्ये आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गुरुवारी हा तानपुरा भेट देण्यात येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news