Pune Youth Congress Protest: नीट पेपरफुटीविरोधात पुण्यात युवक काँग्रेस आक्रमक; मोहोळ यांच्या कार्यालयाबाहेर भरपावसात आंदोलन

‘विद्यार्थ्यांना न्याय द्या’च्या घोषणा; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
Pune Youth Congress Protest
Pune Youth Congress ProtestPudhari
Published on
Updated on

पुणे: दिल्लीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या नीट पेपरफुटीविरोधी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी पुण्यात मंगळवारी युवक काँग्रेसच्या वतीने आक्रमक आंदोलन करण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या मुख्य कार्यालयाबाहेर भरपावसात मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकत्र येत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते.

Pune Youth Congress Protest
Pune Rainfall Update: पुण्यात पावसाचा जोर वाढला; २४ तासांत खडकवासला धरणसाखळीत ०.६४ टीएमसी पाण्याची भर

नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरातील तरुणाईमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ सरकारविरोधात मोठे आंदोलन सुरू आहे. आज कॉंग्रेसनेते राहुल गांधी यांनी देखील पंतप्रधान कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या या आंदोलनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात युवक काँग्रेसने केंद्र सरकारवर थेट निशाणा साधत मोहोळ यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली.

Pune Youth Congress Protest
Shirur Leopard Attack: शिरूर तालुक्यात बिबट्याचा थरार! पाच वर्षांच्या चिमुकलीचा हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू

मुसळधार पावसाची तमा न बाळगता युवक काँग्रेसचे कार्यकर्ते कार्यालयाबाहेर ठिय्या मांडून बसले होते. कार्यकर्त्यांनी 'नीट घोटाळ्याची चौकशी करा', 'विद्यार्थ्यांना न्याय द्या', 'धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा' अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत केंद्र सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला.

Pune Youth Congress Protest
Akshar Wari: संत तुकारामांचा भक्तिमार्ग : भक्ती आणि कर्माच्या संगमातून चित्तशुद्धीचा विज्ञाननिष्ठ संदेश

घोषणाबाजीमुळे मोहोळ यांच्या कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आंदोलनाची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलन कायम राहिल्याने पोलिसांनी प्रमुख कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली.

Pune Youth Congress Protest
Pune Green Hydrogen Centre of Excellence: पुण्यात 'ग्रीन हायड्रोजन सेंटर ऑफ एक्सलन्स'ची तयारी; एनसीएलकडून हायड्रोजन बसचे सादरीकरण

पोलिसांनी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून, त्यानंतर परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. या कारवाईदरम्यान कार्यालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. युवक काँग्रेसने मात्र नीट प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news