Balbharati New Textbooks 2026-27: बालभारतीकडून 2री ते 6वीसाठी नवीन पाठ्यपुस्तकांचा निर्णय

2026-27 मध्ये सुधारित अभ्यासक्रमानुसार पुस्तके प्रकाशित होणार; पालकांना खरेदीबाबत सूचना जारी
Book
Book Pudhari
Published on
Updated on

पुणे: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात ‌‘बालभारती‌’तर्फे 2026-27 या शैक्षणिक वर्षात जून 2026 मध्ये इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी, आणि सहावीची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित होणार आहेत, त्यामुळे पालकांनी ही नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके खरेदी करावीत, असे ‌’बालभारती‌’च्या संचालिका अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.

Book
Pune Gay Dating App Robbery: गे डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढून लूट; पुण्यात टोळी अटकेत

‌‘बालभारती‌’ची कोणती पुस्तके घ्यावीत आणि कोणती घेऊ नयेत, याबाबत ‌‘बालभारती‌’ने पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष 2026-27 हे इयत्ता पाचवी, सातवी, नववी आणि अकरावी या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष असणार आहे. त्यामुळे या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार करावी, अशा सूचना ‌‘बालभारती‌’तर्फे संबंधितांना करण्यात आल्या आहेत.

Book
Maharashtra Vertical Property Card: फ्लॅटधारकांसाठी ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ योजना गतीत

इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांना इंग््राजी माध्यमासाठी ‌’शिकू मराठी आनंदे‌’ तसेच हिंदी, उर्दू ,गुजराती, कन्नड, सिंधू, तेलुगू, तमिळ व बंगाली या इतर माध्यमांसाठी ‌’करू मैत्री मराठीशी‌’ ही मराठी भाषेची अनिवार्य पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इयत्ता सहावीसाठी हिंदी सुलभभारती व हिंदी सुगमभारती, तसेच सुगम भारती (कन्नड संयुक्त) तारुफे उर्दू, सिंधू भारती अरे /देव, तेलुगू सरल भारती, गुजराती साहित्य परिचय ही पुनर्मुद्रण (जुन्या अभ्यासक्रमाची) वैकल्पिक पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Book
Private School Teachers TET Verification: खासगी शाळांतील शिक्षकांच्या टीईटी पात्रतेचीही होणार तपासणी

इयत्ता पाचवी, सातवी व इयत्ता आठवीच्या एकात्मिक व नियमित पाठ्यपुस्तकांमधील आशय मूल्यमापन योजना समान आहे. तसेच ही दोन्ही प्रकारची पाठ्यपुस्तके प्रचलित अभ्यासक्रमावर आधारित आहेत. ही पाठ्यपुस्तके भांडारात शिल्लक असून, विक्रीसाठी उपलब्ध आहेत. इयत्ता नववी ते बारावीसाठी विषय योजना व मूल्यमापन योजनेनुसार विद्यार्थ्यांनी या इयत्तांसाठी ‌‘बालभारती‌’ने तयार केलेल्या प्रात्यक्षिक नोंदवहीचा वापर करणे बंधनकारक राहील, कोणत्याही शैक्षणिक संस्थेने खासगी प्रकाशकांच्या प्रात्यक्षिक नोंदवहीचा वापर करण्याचे बंधन किंवा सक्ती विद्यार्थ्यांवर करू नये.

Book
Pune Mangalore Direct Flight: पुणेकरांसाठी खुशखबर! पुणे-मंगलोर थेट विमानसेवा 1 जूनपासून सुरू होण्याची शक्यता

स्वाध्याय पुस्तिकांवर मिळणार 40 टक्के सूट

पाठ्यपुस्तक महामंडळातर्फे महाराष्ट्रातील शिक्षण तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांनी मराठी व इंग््राजी माध्यमातील इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांच्या वैशिष्ट्‌‍यपूर्ण व दर्जेदार स्वाध्याय पुस्तिकांची निर्मिती केलेली आहे. या स्वाध्याय पुस्तिकांच्या दर्शनी किमतीवर 40 टक्के सूट देण्यात येत आहे, तरी विद्यार्थ्यांनी या स्वाध्यायपुस्तिकांचा वापर करावा, असे देखील ओक यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news