कुंभार यांना ‘युथ आयडाॅल कलारत्न’ पुरस्कार

ऋतिक कुंभार यांना पुरस्कार प्रदान करताना शुभदा जाेशी आणि ह. भ. प. श्यामसुंदर महाराज साेन्नर-आळंदीकर आणि डाॅ. जे. सानिपीना राव.
ऋतिक कुंभार यांना पुरस्कार प्रदान करताना शुभदा जाेशी आणि ह. भ. प. श्यामसुंदर महाराज साेन्नर-आळंदीकर आणि डाॅ. जे. सानिपीना राव.
Published on
Updated on
पुणे : पुढारी वृत्तसेवा
मनुष्यबळ विकास लाेकसेवा अकादमी आयाेजित 'राज्यस्तरीय गुणिजन गाैरव' पुरस्कार प्रदान समारंभ सोमवार १६ मे रोजी पार पडला. या समारंभामध्ये गेली सात वर्षे चित्रकलेतील उत्कृष्ट याेगदानाबद्दल ऋतिक कुंभार यांना 'राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडाॅल कलारत्न' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ह. भ. प. श्यामसुंदर महाराज साेन्नर-आळंदीकर यांच्या हस्ते पुण्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी पद्मश्री डाॅ. विजयकुमार शहा, डाॅ. जे. सानिपीना राव, डाॅ. शुभदा जाेशी, प्रकाश सावंत, मीनाक्षी गवळी, मनीषा कदम आदी उपस्थित हाेते. या वेळी वेगवेगळ्या क्षेत्रांतील १०० जणांचा विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. कुंभार हे मूळचे ल्हासुर्णे (ता. काेरेगाव, जि. सातारा) येथील आहेत. त्यांनी पुण्यातील अभिनव महाविद्यालयातून कमर्शिअल अप्लाइड आर्ट डिप्लाेमा पूर्ण केला आहे. त्यांचा पाेर्ट्रेट, लॅंडस्केप, भित्तिचित्रे काढण्यात विशेष हातखंडा आहे.
हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news