धुळ्यातील 14 जोडप्यांचा आदर्श ; पैसे वाचवून सामुदायिक विवाह | पुढारी

धुळ्यातील 14 जोडप्यांचा आदर्श ; पैसे वाचवून सामुदायिक विवाह

धुळे (पिंपळनेर) पुढारी वृत्तसेवा
धुळे जिल्ह्यामधील साक्री (Sakri) तालुक्यात आमखेल शिवार धवळीविहीर फाटा येथे सामुहिक आदिम लगीन सोहळा मान्यवरांच्या हस्ते उत्साहात पार पडला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष यशवंत पवार, आमदार मंजुळा गावीत, डॉ. तुळशिराम गावीत यांच्या प्रमुख उपस्थितीत आदिवासी कोकणी समाजातील १४ जोडप्यांचे आदिम लग्न लावण्यात आले.

यावेळी बोलताना, आमदार गावित म्हणाल्या की, सामुदायिक विवाहामध्ये मोठ्या संख्येने भाग घेवून होणारा खर्च वाचणार आहे. आज साधारण लग्न केले तरी दोन ते तीन लाख रुपये खर्च होत असतो. आज १४ जोडप्यांमुळे तीस लाख रुपये वाचविण्याचे मोलाचे काम प्रतिष्ठानने केले असल्याचे त्या म्हणाल्या. मा. आ. डी. एस. अहिरे म्हणाले की, नवदाम्पत्यांनी आदिम लगीन सोहळ्यात सहभाग घेवून समाजाला नवीन दिशा देण्याचे काम केले आहे. कार्यक्रमास मा. आ. वसंत सुर्यवंशी, इंजि.मोहन सुर्यवंशी, पंचायत समिती सभापती प्रतिभा सुर्यवंशी, मा.जि.प.सदस्या लिला सुर्यवंशी, मा.खा. बापूसाहेब चौरे, अप्पर पोलीस अधिक्षक नंदुरबार विजय पवार यांनीही नवदाम्पत्यास शुभेच्छा दिल्या. आदिम लग्न मंगलाष्टके रोडू चौधरी, दत्तू साबळे, रमेश भोये, प्रशांत ठाकरे, रमेश चौधरी, गोरख राऊत, ईश्वर राऊत, शशिकांत भुसावरे, दत्तू साबळे, वंजी पवार, देवा पवार यांनी म्हटली. (Sakri)

यावेळी प्रमुख राजकीय क्षेत्रातील लोकप्रतिनिधी जि.प.सदस्य धुळे डॉ.नितीन सुर्यवंशी, धीरज अहिरे, विश्वास बागूल, जि.प.सदस्या लताबाई वसंत पवार, जि.प.सदस्य विजयकुमार अहिरे, जि.प.सदस्य अनिता चौरे, सभापती गणपत चौरे, जि.प.सदस्य देवमन पवार, योगेश चौधरी, मा.जि.प.सदस्य डॉ.पोपट साबळे, बाळू अहिरे, पं.स.सदस्या संगिता गावीत, कमलबाई थैल, सामाजिक कार्यकर्ते पंकज सुर्यवंशी, पं.स.सदस्य संतोष साबळे, पं.स.सदस्य जगन सुर्यवंशी, उपसभापती रेखा बागूल, तालुका अध्यक्ष गणेश गावीत, सरपंच दिलीप बागूल, दिलीप थैल, न्हानाजी अहिरे, राजाराम पवार, तेजाराम साबळे, पुनम बागूल, राजेंद्र पवार, शांताराम गावीत, गुलाब गांगुर्डे, ग्रामविकास अधिकारी संतोष चौरे, रमेश बागूल, पीएसआय विजय चौरे, राजु गायकवाड, एकता परिषदेचे देवा पवार, प्रा.दिनेश सुर्यवंशी, आदिवासी बचाव अभियानाचे प्रतिभा चौरे, सिंधूताई पवार, लता गांगुर्डे, मुख्याध्यापिका गिता चौधरी,  मिरा गवळी, अनिता गवळी, मिना रमेश चौधरी, उज्वला गायकवाड,  विजया साबळे, वंदना कोकणी, इंजि.हर्षाली गायकवाड, प्रा.पुजा सुर्यवंशी, अनुराधा कोकणी,  मंगल चौरे, पो.हे.कॉ.मुंबई कैलास पवार, डॉ.जितेश चौरे, डॉ.चेतन पवार, डॉ.दिनेश पवार, योगेश गावीत, प्रमोद गायकवाड, प्रा.गोकुळदास ठाकरे, तालुका कृषि अधिकारी तळोदा नरेंद्र महाले, तंत्र अधिकारी कृषि विभाग नंदुरबार वसंत चौधरी, कनिष्ठ अभियंता सुरेश पवार, सुधाकर चौरे, गटविकास अधिकार जयंत चौरे, सहाय्यक नगर रचनाकार भटू पवार, पशुविकास अधिकारी संजय कोकणी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, गटविकास अधिकारी जे.टी. सुर्यवंशी, दुय्यम निबंधक सुरेश पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंबई निलेश बागूल, असिस्टंट कमिश्नर किशोर चौरे, स्वियसहाय्यक शिवाजी सुर्यवंशी, विक्रीकर निरीक्षक सिद्धेश चौधरी, आदिवासी बचाव अभियानचे राम चौरे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष जगन्नाथ गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन प्रतिभा चौरे यांनी तर आभार सुलतान पवार यांनी मानले. सोहळा यशस्वीतेसाठी आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी तालुक्यातील धवळीविहीर, कुत्तरमारे, वाल्हवे, विटावे, ऐचाळे, सिंदवन, भोरटीपाडा, बासर, चिपलीपाडा येथील भोजन व्यवस्था करणारे मंडळी यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.

 बैलगाडीवरुन मिरवणूक ….
आदिवासी रितीरिवाजाप्रमाणे नवरदेवास बैलगाडीवर बसवून मारुती मंदिर येथे जावून पुजा करण्यात आली. यावेळी आदिवासी नृत्यासह, सांबळ वाद्यांवर ठेका धरत मोठ्या उत्साहाने तरुण-तरुणींनी नृत्य सादर केले. कार्यक्रमास आदिवासी समाजातील क्रांतीवीरांच्या प्रतिमेस मान्यवरांचे हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष यशवंत पवार, मंजुळा गावीत, डॉ. तुळशिराम गावीत यांना पुजेचा मान देण्यात आला.

हेही वाचा :

Back to top button