पुणे; पुढारी वृत्तसेवा : राजकीय पक्षांचे पदाधिकारी दयानंद इरकल यांच्यासह तेरा जणांवर चतुःशृंगी पोलिस ठाण्यात खुनाच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेखर महादेव जोगळेकर (58), प्रणव शेखर जोगळेकर (22), दयानंद सिद्राम इरकल (रा. पांडवनगर), बाळू पांडुरंग मिसाळ (54, रा. कर्वेनगर), प्रमोद श्रीरंग शिंदे (29, रा. शिवणे), रूपेश रवींद्र कदम (37, रा. वडारवाडी), संतोष ऊर्फ बंटी दत्तात्रय हरपुडे (38) आणि अन्य अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.