कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची कोंडी | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची कोंडी

संतोष बामणे

जयसिंगपूर : बाजारपेठेत साखरेला चांगला भाव मिळाला असल्याने मागील 400 रुपये द्या, चालू गळीत हंगामातील दर जाहीर केल्याशिवाय उसाचे कांडे कारखान्यांना द्यायचे नाही, अशी भूमिका शेतकरी संघटनांची आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी यांच्यासमवेतची बैठक निष्कळ ठरल्याने आता राज्यातील शेतकर्‍याचे लक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जयसिंगपूर येथे मंगळवार, दि. 7 नोव्हेंबर रोजी होणार्‍या 22 व्या ऊस परिषदेकडे लागले आहे.

त्यामुळे वाढलेली महागाई, बाजारपेठेतील साखरेचे चांगले दर, राज्यासह कर्नाटक सीमाभागात उसाची कमतरता त्यामुळे सोन्याचा दर मिळणार असल्याचे चित्र आहे; तर मागील 400 व चालू दरासाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कारखानदारांची कोंडी निर्माण झाली आहे.

साखरेला चांगला दर मिळाला आहे. साखर कारखान्यांना उपपदार्थातून चांगले पैसे मिळाले आहेत. दुसरीकडे महागाईमुळे सर्व शेतीत लागणार्‍या साहित्यांची मोठी वाढ झाली आहे.

त्यामुळे शेतीतील खर्च आवाक्याबाहेर गेला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात असताना साखर कारखानदारांनी शेतकर्‍यांची दिवाळी गोड करावी, यासाठी गतवर्षी गेलेल्या उसाचा दुसरा हप्ता म्हणून 400 द्यावेत, अशी मागणी गेल्या दोन महिन्यांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना करीत आहे.

Back to top button