पुणे : इम्पोर्ट-एक्सपोर्ट व्यवसायातून जास्त परतावा (4 कोटी) देण्याचे आमिष दाखवून बिल्डरसह मौलानाने जादूटोणा करीत तब्बल 91 लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता दोघांसह त्यांच्या साथीदारांविरोधात महाराष्ट्रातील ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) कलम वाढ करण्यात आली आहे. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नादीर अब्दुल हुसैन हसन अली नईमा आबादी (रा. सिनागग ईस्ट स्ट्रीट, पुणे कॅम्प), सीमा ऊर्फ रोहिया नादीर नईमा आबादी (वय 35, रा. कॅम्प), मौलाना शोऐब मैनुद्दीन आत्तार (रा. जामा मस्जिदशेजारी, बोपोडी), माजीद उस्मान आत्तार (रा. बोपोडी), खालीद मैनुद्दीन आत्तार (रा. बोपोडी), इरम शोएब आत्तार (रा. बोपोडी) यांच्यावर जादूटोणाविरोधी कायदा, फसवणूक, कट रचणे, संगनमत करून अपहार करणे. आता त्याचबरोबर एमपीआयडीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शेख अब्दुल बासित अब्दुल लतिफ (वय 45 रा. कोंढवा खुर्द) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑगस्ट 2020 ते ऑगस्ट 2022 या कालावधीत रास्ता पेठ येथे घडला.
कोरोना काळात बांधकाम व्यावसायामध्ये मंदी असल्यामुळे नादीर व मौलाना शोएब यांना पैशांची गरज होती. त्यांनी शेख यांना विविध आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. फिर्यादी यांनी आरोपींवर विश्वास ठेवून वेळोवेळी 90 लाख 75 हजार रुपये आरोपींच्या बँक खात्यात जमा केले. परंतु, परतावा दिला नाही. मौलाना शोएब याने जादूटोणा करून शेख यांना गुंगीकारक पाणी पिण्यास दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, शेख यांच्याप्रमाणेच आणखी काही जणांची फसवणूक झाल्याचेही तपासात निष्पन्न झाल्याने एमपीडीएनुसार कलम वाढ करण्यात आली आहे.
हेही वाचा