Pune Sexual Assault Case: विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; आरोपी अटक

लोणीकंद पोलिसांची कारवाई; कोंढव्यातही वेगळा गुन्हा दाखल
Crime Against Women
Crime Against WomenPudhari
Published on
Updated on

पुणे: विवाहाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकाला लोणीकंद पोलिसांनी अटक केली. श्रीकांत बाळासाहेब शिंदे (वय २५, रा. मातोश्री निवास, शेजवळ पार्क, चंदननगर, मूळ रा. आडगाव, जि. नाशिक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी, एका 25 वर्षीय तरुणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Crime Against Women
Pune Abu Dhabi Flight: पुण्याहून थेट 'अबू धाबी'साठी नवी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू; पहिल्याच दिवशी 173 प्रवाशांनी केला प्रवास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी शिंदे याची वर्षभरापूर्वी ओळख झाली होती. आरोपीने तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून तरुणीला जाळ्यात ओढले. त्याने तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, तरुणीने विवाहाबाबत विचारणा केल्यानंतर त्याने नकार दिला. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

Crime Against Women
Pune PMC Pothole Free Mission: पुणे मनपा प्रारूप मतदार यादीत घोळ! तब्बल 22,809 तक्रारींचा ‘प्रशासनावर’ पाऊस, कर्मचाऱ्यांची दमछाक

पोलिस उपनिरीक्षक बेंदगुडे तपास करत आहेत. दरम्यान, विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिस उपनिरीक्षक गावडे तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news