पुणे : शेळगाव येथे ‘महावितरण’विरोधात बोंबाबोंब आंदोलन

पुणे : शेळगाव येथे ‘महावितरण’विरोधात बोंबाबोंब आंदोलन

शेळगाव : पुढारी वृत्तसेवा; महावितरण कंपनीने ऐन उन्हाळ्यात शेती पंपाच्या थकबाकी बिलाचे कारण पुढे करत हाती घेतलेल्या वीज तोडणी मोहिमेविरोधात शेळगाव (ता. इंदापूर) येथे महावितरण कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. हे आंदोलनात शेळगाव, कडबनवाडीसह आजूबाजूच्या भागातील शेतकरी, महिला आणि भाजपच्या वतीने अनोख्या पध्दतीने बोंबाबोंब आंदोलन करत कार्यालयावर मोर्चा काढला.

महावितरण कंपनीने विरोधात शनिवारी (दि. ५) रोजी शेळगाव येथील श्री. संत मुक्ताबाई मंदिरापासून ते महावितरण कार्यालयावर शेळ्गाव, कडबनवाडी, शिरसटवाडी, हगारेवाडीसह आजूबाजूच्या परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी तसेच महिला व भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी होत बोंबाबोंब आंदोलन केले.

महावितरणने हाती घेतलेल्या वीज तोडणी मोहिमेमुळे या भागातील शेतातील पिके जळू लागली आहेत. शिवाय माणसांच्या व जनावरांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी महिलांना वणवण करण्याची वेळ आली आहे. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी तसेच महिलांनी तीव्र भाषेत महाविकास आघाडी सरकारचा तसेच उर्जामंत्री व महावितरणचा विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मनोगतातुन तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

यावेळी आंदोलनात लवकरात-लवकर वीज पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशारा देखील यावेळी संतापलेल्या शेतकऱ्यांनी दिला. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त शेळगाव येथील महावितरण कार्यालयावर तैनात होता.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news