Pune News : एक कुंभारवाडा, पणत्या 50 हजार!

Pune News : एक कुंभारवाडा, पणत्या 50 हजार!
Published on
Updated on

पुणे : लहान मुले आई-वडिलांसोबत लक्ष्मीची मूर्ती रंगवत होते, तर पणत्यांना नक्षीदार रूप देण्यात युवती मग्न होत्या. दीपावली जवळ आल्याने वैविध्यपूर्ण वस्तूंनी केशवनगर भागातहील कुंभारवाडा सजला आहे. काही कुंभार व्यावसायिकांनी 50 हजार पणत्या तयार केल्या आहेत, तर काहींनी 20 हजार लक्ष्मीच्या मूर्ती तयार केल्या आहेत. त्यामुळेच वस्तूंनी कुंभारवाडा गजबजला आहे.

मुंढव्यातील कुंभारवाड्यात कोणाची सातवी पिढी तर कोणाची तिसरी पिढी या व्यवसायात असून, संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन वस्तू तयार करीत आहेत. त्यामुळेच कुंभारवाड्यातील प्रत्येक घर पणत्यांनी, दिव्यांनी सजले आहे. छोटे व्यावसायिक, व्यापारी होलसेल दरात कुंभारवाड्यात येऊन वस्तूंची खरेदी करीत आहेत. काही व्यावसायिक 700 ते 800 पणत्या, तर काही व्यावसायिक 1 ते 2 हजार लक्ष्मीमूर्ती कुंभार व्यावसायिकांकडून विकत घेऊन त्याची विक्री बाजारपेठांमध्ये करीत आहेत.

कुंभारवाड्यात पणत्या 20 रुपये डझनने विकल्या जात आहेत तर बोळकीची किंमतही 10 ते 20 रुपयांच्या आसपास आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाकर शिंदे हे कुंभारवाड्यात वस्तू बनवून विकण्याचा व्यवसाय करीत आहेत. त्यांचे संपूर्ण कुटुंबही त्यांना व्यवसायात मदत करतात. शिंदे म्हणाले, गणेशोत्सवानंतर वस्तू बनविण्यास आम्ही संपूर्ण कुटुंब सुरुवात करतो. पणत्या, लक्ष्मी आणि बोळकी बनवून आम्ही तयार करून विकतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही 50 हजार पणत्या आणि पंधरा हजार बोळकी तयार करणार आहोत, ते जवळपास संपले आहे.

सध्या बोळकी, पणत्या, लक्ष्मी, मावळे आणि इतर चित्र, किल्ल्यांना रंग देण्याचे काम करीत आहोत. माझे कुटुंबीयही मला व्यवसायात मदत करीत असून, राजस्थानी मातीपासून आम्ही पणत्या तयार करीत आहोत. पाच ते सहा हजार पणत्या तयार केल्या आहेत. यंदा वस्तूंना चांगली मागणी आहे आणि मागणीप्रमाणे आम्ही वस्तू तयार करून देत आहोत.

– सुभाष जामदार, कुंभारवाड्यातील व्यावसायिक

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news