मराठा आंदोलन : पुणे -सातारा महामार्गावर आंदोलनाची हाक, राजकीय नेत्यांना बंदी | पुढारी

मराठा आंदोलन : पुणे -सातारा महामार्गावर आंदोलनाची हाक, राजकीय नेत्यांना बंदी

नसरापूर : पुढारी वृत्तसेवा :  मराठा आरक्षणासाठी लढा देणार्‍या मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाच्या वतीने पुणे-सातारा महामार्गावर येत्या रविवारी रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या आंदोलन सभेत कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना बोलाविण्यात येणार नाही, व्यासपीठावर किंवा माईकवर भाषण बंदी आल्याचा निर्णय नसरापूर परिसरातील मराठा समाजाच्या बांधवांनी घेतला आहे. आम्ही मराठा कुणबी (शेतकरी) असल्याचा पवित्रा घेत नसरापूर येथील जानकीराम मंगल कार्यालयात मंगळवारी (दि. 31) बैठक पार पडली.

संबंधित बातम्या :

या वेळी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची माहिती देण्यात येऊन आपणही या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे, त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगत आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी मराठा आरक्षण मिळेपर्यंत आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रसंगी मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव उपस्थित होते. रविवारी (दि. 5) नोव्हेंबर रोजी नसरापूर येथील प्राथमिक शाळेच्या पटांगणावर सर्व मराठा समाजबांधव एकत्र येऊन पदयात्रा काढून चेलाडी येथे महामार्गावर दखलपात्र रास्ता रोको आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधणार असल्याचे बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. या वेळी शांततेच्या मार्गाने रास्ता रोको आंदोलन करून रस्त्याच्या कडेला लक्ष्मीगंगा मंगल कार्यालयाच्या आवारात सभेचे अयोजन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी सर्व भागात प्रचार व प्रसिध्दी करण्यात येणार असून, जास्ती जास्त समाजबांधवांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी
केले आहे.

Back to top button