15 लाखांची खंडणी मागणार्‍या पुणे शहरातील पोलिसावर गुन्हा

file photo
file photo

वरवंड : पुढारी वृत्तसेवा : वरवंड (ता.दौंड) येथील खूनप्रकरणी 15 लाख रुपयांची खंडणी मागितली म्हणून यवत पोलिसांनी पुणे शहर पोलिस दलातील एका कर्मचार्‍यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक 27/ 3/ 2022 रोजी वरवंड येथील राहुल भंडारी यांचे सासरे सुरेश गांधी यांचा गळा आवळून वन विभागाच्या जागेत खून करण्यात आला होता. संबंधित खून करतानाचा व्हिडिओ माझ्याकडे असून, या प्रकरणात तुमच्या घराच्या सगळ्यांना अडकवू शकतो.

असे सांगत मला पंधरा लाख रुपये रोख द्या, अशी मागणी वरवंड येथील रहिवाशी आणि पुणे शहर पोलिस दलात कार्यरत असणार्‍या सागर शिंदे यांनी आरोपी राकेश भंडारी यांच्याकडे केली होती तसेच राकेश भंडारी यांच्याकडून यापूर्वी सागर शिंदे यांनी 8 लाख रुपयेदेखील घेतले आहेत, यामुळे खून झालेली व्यक्ती सुरेश गांधी यांचे जावई राहुल भंडारी यांनी यवत पोलिसात सागर शिंदे यांच्या विरोधात तक्रार दिल्यावरून यवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे करत आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news