Pune Airport : पुणे विमानतळावर एस्केलेटर रॅम्पची सेवा; प्रवाशांना दिलासा | पुढारी

Pune Airport : पुणे विमानतळावर एस्केलेटर रॅम्पची सेवा; प्रवाशांना दिलासा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : विमानतळावर उतरल्यावर अवजड बॅगा घेऊन कॅबसाठी धावपळ करणार्‍या विमान प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, विमानतळ प्रशासन टर्मिनल ते एरोमॉलला जोडणार्‍या पुलावर 80 मीटरचा एस्केलेटर रॅम्प (सरकणारा) टाकत असून, त्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या रॅम्पमुळे प्रवाशांना अवजड बॅगा घेऊन धावपळ करावी लागणार नाही.

पुणे विमानतळावरून दररोज 190 पेक्षा जास्त विमाने उड्डाण करतात. त्याद्वारे दररोज 26 ते 28 हजार प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांना कॅब पकडण्यासाठी पुणे विमानतळावर उतरल्यावर एरोमॉलमध्ये जावे लागत आहे. मात्र, टर्मिनल ते एरोमॉल अंतर खूपच लांब असल्याने प्रवाशांना अवजड बॅगांसह मोठी पायपीट करावी लागत होती. त्या पार्श्वभूमीवर विमानतळ प्रशासनाकडून हा एस्केलेटर रॅम्प बसवण्यात येत आहे. यामुळे पुणेकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा

Pune School News : पुण्यात अनधिकृत शाळा; 158 विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न, तिघांवर गुन्हा

उत्तर महाराष्ट्रावर दुष्काळाची छाया, ६०० गावे-वाड्या तहानलेल्या

बेळगाव: रताळी हंगाम सुरू, मलकापूर जातीच्या रताळ्यांना सर्वाधिक दर

Back to top button