पुणे पुन्हा हादरले! कुरकुंडीमध्ये पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये गोळीबाराचा थरार; तिघे ताब्यात | पुढारी

पुणे पुन्हा हादरले! कुरकुंडीमध्ये पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये गोळीबाराचा थरार; तिघे ताब्यात

चाकण : पुढारी वृत्तसेवा

पिंपळे गुरव येथे भर चौकात गोळीबार करून खून केल्याच्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. यात स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी दोन राऊंड फायर केले. चाकण (ता.खेड, जि. पुणे) जवळील कुरकुंडी गावात ही घटना रविवारी (दि.२६) रात्री बाराच्या सुमारास घडली.

पुणे आणि परिसराची हवा ‘स्मॉग’ने बिघडली!

योगेश रवींद्र जगताप (वय ३६, रा. पिंपळे गुरव) यांचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. पिंपळे गुरव येथे १८ डिसेंबर रोजी सकाळी ही घटना घडली होती. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात अकरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींच्या मागावर पोलिसांची विविध पथके रवाना झाली होती.

पुणे : ‘पुढारी’च्या दणक्याने ‘पीएमआरडीए’ खडबडून जागी

दरम्यान, यातील आरोपी खेड तालुक्यात चाकण जवळील कुरकुंडी गावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांची चार पथके रात्री साडेअकरा वाजता कुरकुंडी गावात दाखल झाली. यावेळी आरोपींनी पोलिसांच्या दिशेने पिस्तूलातून दोन फैरी झाडल्या.   स्वसंरक्षणार्थ पोलिसांनीही आरोपींच्या दिशेने दोन राऊंड फायर केले. त्यानंतर आरोपींना ताब्यात घेतले असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

elections in five states : पाच राज्‍यांमधील विधानसभा निवडणूक लांबणीवर पडणार? आजच्‍या बैठकीत निर्णयाची शक्‍यता

गोळीबाराच्या थरारनंतर पोलिसांनी गणेश मोटे,  महेश माने आणि अश्विन चव्हाण या तिघांना जेरबंद केले असल्याची माहिती पोलीस वर्तुळातून समोर आली आहे. संबंधित तिघेही योगेश जगताप यांची हत्या करून फरार झाले होते.

ओमायक्रॉनच्या परिस्थितीत बूस्टर डोसचा फायदा होणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

 

Back to top button