elections in five states : पाच राज्‍यांमधील विधानसभा निवडणूक लांबणीवर पडणार? आजच्‍या बैठकीत निर्णयाची शक्‍यता | पुढारी

elections in five states : पाच राज्‍यांमधील विधानसभा निवडणूक लांबणीवर पडणार? आजच्‍या बैठकीत निर्णयाची शक्‍यता

पुढारी ऑनलाईन डेस्‍क
कोरोनाचा नवा व्‍हेरियंट ओमायक्रॉनच्‍या धोका कायम असल्‍याचे संशोधकांनी म्‍हटलं आहे. या पार्श्वभूमीवर पाच राज्‍यांमधील आगामी विधानासभा निवडणुकीबाबत ( elections in five states ) केंद्रीय निवडणूक आयोग कोणता निर्णय घेणार, याकडे राजकीय पक्षांचे लक्ष वेधले आहे. पाच राज्‍यांमधील विधानसभा निवडणुका या तीन महिन्‍यांसाठी लांबणीवर टाकल्‍या जातील, असे वृत्त एका इंग्रजी वेबसाइईटने दिले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्‍या आजच्‍या बैठकीत यासंदर्भातील निर्णय होण्‍याची शक्‍यताही वर्तविण्‍यात येत आहे.

२०२२मध्‍ये उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड आणि पंजाब राज्‍यांमधील विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकांवर ओमायक्रॉन संकटाचे सावट आहे. कोरोनाच्‍या दुसर्‍या लाटेमध्‍येही काही राज्‍यांमधील विधानसभा निवडणुका पार पडल्‍या होत्‍या.

elections in five states : आज होणार महत्‍वपूर्ण बैठक

कोरोनाचा नवा व्‍हेरियंट ओमायक्रॉन संसंर्गामुळे गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूरमधील आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात आज निवडणूक आयोग महत्त्‍वपूर्ण बैठक घेणार आहे. या बैठकीत निवडणुकीसंदर्भातील निर्णय होईल, अशी शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे. या बैठकीला केंद्रीय आरोग्‍य सचिव राजेश भूषण यांचीही प्रमुख उपस्‍थिती असणार आहे. यावेळी कोरोनाच्‍या तिसर्‍या लाटेसंदर्भातही विचार होईल. पाच राज्‍यांमधील विधानसभा निवडणुका या तीन महिन्‍यांसाठी लांबणीवर टाकल्‍या जातील, असे मानले जात आहे.

कोरोनाचा धोका अद्‍याप टळलेला नाही, असे संशोधक वारंवार स्‍पष्‍ट करत आहेत. मे २०२१मध्‍ये कोरोनाची दुसरी लाट असताना पश्‍चिम बंगालमध्‍ये विधानसभा निवडणूक झाली होती. यावर अलाहाबाद उच्‍च न्‍यायालयाने तीव्र नाराजी व्‍यक्‍त केली होती. त्‍यामुळे पाच राज्‍यांतील आरोग्‍य परिस्‍थितीचा आढावा घेतल्‍यानंतर निवडणूक जाहीर केली जाईल, असेही या वृत्तात म्‍हटलं आहे.

निवडणूका लांबणीवर पडणार?

मागील काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने आगामी पाच राज्‍यांमधील निवडणुकांबाबत भाष्‍य केले होते. कोरोनाच्‍या तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेवून निवडणुका लांबणीवर टाकण्‍यात येणार का, याकडेही संबंधित राज्‍यातील राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहेत. गर्दी होणार याची काळजी घेवूनच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल, असेही वृत्तसंस्‍थेने म्‍हटलं आहे.

हेही वाचलं का? 

 

Back to top button