विरोधकांची अनुपस्थिती अन् भाजपवर विरोधी पक्षनेत्यांचा आरोप | पुढारी

विरोधकांची अनुपस्थिती अन् भाजपवर विरोधी पक्षनेत्यांचा आरोप

पुणे : पुढारी वृत्तसेवा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन समारंभाला महापालिकेतील विरोधी पक्षांनी पाठ फिरविली. सत्ताधारी भाजपच्या राजकारणामुळे या समारंभाला इच्छा असूनही उपस्थित राहता येऊ शकले नाही. पास उशीरा मिळाल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी केला.

केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते महापालिकेच्या मुख्य इमारतीत हा समारंभ झाला. मात्र, या समारंभाला विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या महापालिकेतील पदाधिकार्‍यांनी या समारंभाकडे पाठ फिरविली. केवळ शिवसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे याच विरोधी पक्षातून एकमेव उपस्थित होत्या.

नवीन पिढीला मंदिरांमागचे विज्ञान समजले पाहिजे : देगलूरकर

दरम्यान, विरोधी पक्षनेत्या धुमाळ यांनी या कार्यक्रमाचे पास सकाळी अकरा वाजता मिळाले. मात्र, कार्यक्रमाला येताना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असल्याचे महापौर कार्यालयातून सांगण्यात आले. ही चाचणी केल्यानंतर तीन दिवसांनी रिपोर्ट मिळतो, याची जाणीव असतानाही सत्ताधारी भाजपने जाणीवपूर्वक हे केल्याचा आरोप धुमाळ यांनी केला.

हेही वाचा

कोरोनाची लस घेतलेल्या 90% भारतीयांना ओमायक्रॉन संसर्गाचा धोका

शेअर बाजारात हाहाकार! अवघ्या १५ मिनिटांत ५ लाख कोटींचा चुराडा

Rohini Court Blast Case : वैज्ञानिक भारत कटारियांचा आत्महत्येचा प्रयत्न

अभिनेता आर. माधवन दुबईला शिफ्ट होणार

Back to top button