खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची निव्वळ भुरळ

Sports
Sports
Published on
Updated on

सुनील जगताप

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्रीडा क्षेत्राला उभारी देण्याच्या उद्देशाने क्रीडामंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचा प्रस्ताव मांडून त्याला मंत्रिमंडळाची मंजुरीही मिळवली. मात्र, या विद्यापीठाचे काम ज्या गतीने होणे अपेक्षित होते, ते 2021 मध्ये झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे खेळाडू आणि प्रशिक्षकांना या विद्यापीठाची निव्वळ भुरळ पाडण्यातच क्रीडा विभाग धन्यता मानत असल्याचे समोर आले आहे.

Ajenda Sports
Ajenda Sports

क्रीडापटू आणि एकूणच क्रीडा क्षेत्रासाठी 2021 हे वर्ष फारसे चांगले गेलेेले नाही. या वर्षात काही प्रमाणात स्पर्धा पार पडल्या असल्या तरी जलतरण क्रीडा प्रकाराची स्पर्धा मात्र अद्यापही सुरू झालेली नाही. शासनाच्या वतीने आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा झाली होती. या विद्यापीठ स्थापनेनंतर प्रथम वर्षी स्पोर्ट्स सायन्स, स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी व स्पोर्ट्स कोचिंग व ट्रेनिंग हे 3 अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार होते. या अभ्यासक्रमांची सुरुवात जून 2021 पासून होणार होती. परंतु विद्यापीठाच्या उपक्रमाला विलंब झाला आहे.

गिर्यारोहणावरील अभ्यासक्रम सुरू

गिर्यारोहण आणि संलग्न साहसी क्रीडा प्रकारासाठी पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम संयुक्तरीत्या राबविण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये गिर्यारोहणातील पदविका अभ्यासक्रमाचा पहिला वर्ग यशस्वीरीत्या सुरू झाला. त्याला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता त्याच धर्तीवर गिर्यारोहण विषयातील तीन महिन्यांच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची विद्यापीठात सुरुवात होत आहे. हा अभ्यासक्रम येत्या नवीन वर्षात म्हणजेच 2022 च्या जानेवारी महिन्यात सुरू होणार असून, त्यासाठीची प्रवेशप्रक्रिया 1 डिसेंबरपासून सुरू झाली आहे.

गिर्यारोहण
गिर्यारोहण

या कोर्सचे सर्व संचालन आणि प्रशिक्षण गिरिप्रेमी या गार्डीयन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग (जीजीआयएम) संस्थेच्या अनुभवी आणि पात्र गिर्यारोहकांकडून केले जाणार आहे. या तीन महिन्यांच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमात सह्याद्री पर्वतरांगांमधील खडतर प्रशिक्षणाचा समावेश असणार आहे. हा अभ्यासक्रम ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने सात दिवसांचा सह्याद्री अभ्यासवर्ग असेल, असे जीजीआयएमचे संस्थापक संचालक उमेश झिरपे यांनी सांगितले.

'क्रीडा धोरण मांडणार'

'2018 च्या क्रीडा धोरणावर पूर्ण विचार करण्यात आला असून, त्याचा प्रस्ताव आमच्या खात्याकडून सभागृहात मांडला जाणार आहे. त्याचबरोबर पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर माजी 15 रणजीपटूच केवळ प्रशिक्षण देऊ शकतात, असा महापालिकेमध्ये नियम असतानाही तो पाळला जात नव्हता. त्यामुळे त्याबाबत निश्चित धोरण ठरविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडूंचा सन्मानही करण्यात येणार आहे,' असे महापालिका क्रीडा समिती अध्यक्ष अजय खेडेकर यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितले.

'महाराष्ट्र केसरी'ची अनिश्चितता

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने डिसेंबरमध्ये दरवर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवली जात असते. पण, कोरोनाचा प्रभाव या वर्षात तब्बल सहा ते सात महिने कायम राहिल्याने जिल्हा आणि राज्य कुस्ती स्पर्धा पार पडण्यास विलंब झाला. मात्र, यामधूनही मार्ग काढत डिसेंबरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याबाबतची चर्चा कुस्तीगिरांमध्ये सुरू होती. याबाबत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे महासचिव बाळासाहेब लांडगे म्हणाले की, या वर्षी डिसेंबरमध्ये होणारी महाराष्ट्र केसरी ही महत्त्वाची स्पर्धा रखडली आहे. नव्या वर्षात कुस्तीपटूंना महाराष्ट्र केसरीची मेजवानी देण्याचा विचार सुरू आहे. त्याबाबतचे नियोजन अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याबाबत अधिकृत घोषणा करू.

काय होता अजेंडा?
  • शहराच्या प्रत्येक भागात मोकळ्या मैदानांची आवश्यकता
  • क्रीडा विद्यापीठाची सक्षम उभारणी
  • 2018 च्या क्रीडा धोरणातील योजनांची अंमलबजावणी
  • महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणे गरजेचे
  • स्पर्धा झाल्यास ग्रेस गुणांचा फायदा
  • गिर्यारोहणावर आता पदविका अभ्यासक्रम
  • स्पर्धात्मक खेळाऐवजी शारीरिक तंदुरुस्ती, मानसिकतेवर अधिक भर
प्रत्यक्षात झाले असे …
  • क्रीडा विद्यापीठाचे काम रखडले
  • विद्यापीठाला मिळेना कुलगुरू
  • 2018 चे क्रीडा धोरण कागदावरच
  • महाराष्ट्र केसरी स्पर्धा आता नव्या वर्षात
  • गिर्यारोहणावर पदविका व प्रमाणपत्र कोर्स सुरू

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news