पुणे, पुढारी वृत्तसेवा : माजी रणजीपटू अनिल वाल्हेकर यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या ( एमसीए ) बेकायदेशीर निवडणुकीच्या विरुद्ध जन आंदोलनाची सुरुवात 'एमसीए' अध्यक्षांच्या घरासमोर घंटानाद करीत झाली. या आंदोलनासाठी माजी रणजीपटू सुभाष रांजणे , राहुल कानडे, प्रसाद कानडे ,रणजीत खिरीट, पूना क्लबचे पदाधिकारी अभिषेक बोके, नितीन कोकाटे, स्टेडियम क्लबचे संस्थापक भारत मारवाडी, आनंद केदारी उपस्थित होते.
अनिल वाल्हेकर म्हणाले, "महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची कार्यकारिणी मुळात चुकीची असून, ती बीसीसीआयच्या मार्गदर्शक तत्वांविरोधात काम करत आहे. बीसीसीआयच्या सर्वोच्च न्यायालय नियुक्त समितीने त्यांची २०१९ ते २०२२ या कालावधीसाठी झालेली निवडणूक यापूर्वीच रद्दबातल ठरवली आहे. त्यामुळे बीसीसीआयने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचा मताधिकारही काढून घेतला आहे. त्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी चेंज रिपोर्ट बदलून निवडणूक घटनेनुसार असल्याचा सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे बदललेल्या घटनेनुसार हे पदाधिकारी काम करत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे."
त्याविरोधात जनआंदोलन करण्यात आले आहे. पीएमटीचे व माजी खेळाडू निरंजन साळवी यांनी यावेळी निवेदन केले. आजच्या घंटानादामुळे झोपेचे सोंग घेतलेले एमसीएचे पदाधिकारी जागे होतील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
हेही वाचलं का?