कोल्हापूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी राजीनामा द्यावा अन्यथा… | पुढारी

कोल्हापूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी राजीनामा द्यावा अन्यथा...

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा

कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट असल्याचं धक्कादायक विधान केल्याच्या निषेधार्थ येथील संतप्त शिवसैनिकांनी मुख्यमंत्री बोम्मई यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून तो दहन केला. यावेळी बोंबठोक करत या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला.

थिएटर चौक येथे कर्नाटक राज्यात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्त येथील शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून थिएटर चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली.

यावेळी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव म्हणाले, महाराष्ट्र एकीकरण समितीचे दीपक दळवी यांच्या अंगावर शाई फेकून त्यांचा अपमान करण्यात आला, शिवसेनेचा ध्वज जाळला, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना घटना छोटीशी असल्याचे कर्नाटकचे मुखमंत्री बसवराज बोम्म्मई यांनी केलेले विधान म्हणजे मराठी अस्मितेचा अपमान केला जात आहे. मुख्यमंत्री बोम्मई याने ही दैवताचा अवमान केला आहे. त्यांनी राजीनामा द्यावा. विटंबना करणाऱ्या समाजकंठकांना फाशीची द्यावी अन्यथा आम्ही तलवारी घेऊन कर्नाटकात उतरू अशा तीव्र शब्दात त्यांनी घटनेचा निषेध नोंदवला.

यावेळी तालुका प्रमुख वैभव उगळे, उपजिल्हा प्रमुख मधुकर पाटील,शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे, आप्पासाहेब मामा नाईक,महिला जिल्हा प्रमुख मंगल चव्हाण, वैशाली जुगळे, आणसाहेब भिलोरे, आदींनी निषेधात्मक भाषणे केली. यावेळी उपतालुकाप्रमुख युवराज घोरपडे,उपशहर प्रमुख संतोष नरके, युवासेना तालुकाप्रमुख प्रतीक धनवडे, आप्पासाहेब भोसले, मिलिंद गोरे, राजू बेले, आप्पासाहेब गावडे, संजय अनुसे, जयवंत मंगसुळे, अनिकेत बेले, स्वप्नील चव्हाण, बाबासाहेब गावडे, शहारूख गरगरे, निलेश तवंदकर, काकासाहेब नेसुर आदी शिवसैनिकांनी निषेध नोंदवला.

हेही वाचा :  

Back to top button