जळगाव; पुढारी वृत्तसेवा
बोदवड नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचारसभेत बोलताना जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, धरणगावातील रस्ते हे हेमामालिनीच्या गालासारखे आहेत. तुम्हाला साधा बोदवडचा रस्ता करता आला नाही, असा टोला त्यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांचा उल्लेख न करता लगावला.
बोदवड नगरपंचायतीमध्ये शाही पक्षाने आपले उमेदवार उभे केले आहेत. या नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचारानिमीत्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सभा घेतली.
यावेळी नामदार पाटील यांनी, मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचे तीस वर्ष प्रतिनिधीत्व करणाऱ्या एकनाथराव खडसे यांचे नाव न घेता, त्यांना आव्हान दिले की, त्यांनी धरणगावात येऊन बघावे, इथले रस्ते हेमामालिनीच्या गालासारखे आहेत. तसे रस्ते नसतील तर आपण राजीनामा देऊ. महाराष्ट्राला ज्ञान काय शिकवताय, पहिले बोदवडचा रस्ता तरी चांगला करावा, असा टोलाही लगावला.
जळगावचे भाग्य खूप चांगले आहे. इथला कोणताही आमदार मंत्री झाल्यावर त्यांना पाण्याचीच खाती मिळाली आहेत. एकनाथ खडसे जलसंपदा मंत्री, गिरीश महाजन जलसंपदा मंत्री आणि गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्री झाले," त्यांनी चरी ने पाणी दिले, मी पाईप ने पाणी देतो आपले पाणी परफेक्ट जाते., ते प्रत्येक घरापर्यंत जाईल, असेही ते म्हणाले.
हेही वाचा