पुणे शहरात पसरते आहे ते धुके नव्हे ‘स्मॉग’; तज्ज्ञांचे मत | पुढारी

पुणे शहरात पसरते आहे ते धुके नव्हे ‘स्मॉग’; तज्ज्ञांचे मत

पुणे : ज्ञानेश्वर भोंडे : हिवाळा सुरू झाला असून, हवेत गारठा जाणवत आहे. त्यातच पहाटेच्या वेळी धुके नव्हे तर ‘स्मॉग’ दिसत आहे. या धुक्यात मनसोक्त फिरण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. मात्र या ‘स्मॉग’मुळे माणसाच्या आरोग्यासह जनावरे व पिकांनादेखील मोठा धोका असल्याचे मत डॉक्टरांसह हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

पुणे : पैशांसाठी एकाच कुटुंबातील चार जणांचा निर्घृण खून करणार्‍यास फाशी 

‘स्मॉग’चा आरोग्यासह शेती आणि प्राण्यांवर परिणाम होत आहे. त्यामुळे धुक्यात बाहेर पडण्याआधी काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. दिल्ली, मुंबई, बंगळुरुपाठोपाठ आता पुण्यातील हवादेखील वायूप्रदूषणाने दूषित झाली आहे. वाहनांतून बाहेर पडणारा धूर धुक्यात मिसळून त्यापासून ’स्मॉग’ तयार होत आहे. जो आपल्याला धुक्यासारखाच वाटतो. मात्र, तो आरोग्यासाठी घातक ठरत आहे. विशेषकरून ज्या ठिकाणी वाहनांची संख्या जास्त आहे, लोकांची संख्या जास्त आणि आणि झाडांची संख्या विरळ आहे, अशा ठिकाणी जास्त ‘स्मॉग’ तयार होत असल्याचे दिसत आहे.

पुणे : ‘मुन्नाभाई’, ‘सर्किट’ आडकले पोलिसांच्या जाळ्यात

श्वसन विकाराचे रुग्ण वाढले

धुके सूर्यप्रकाशात नाहीसे होते. मात्र, हा स्मॉग सकाळचे दहा वाजले, तरी आपल्याला धुरकट दिसत राहते. म्हणून हा धुके नसून स्मॉग असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. याबाबत अधिक माहिती देताना फुप्फुसविकारतज्ज्ञ डॉ. अपर्णा बिराजदार म्हणाल्या, ’या स्मॉगमुळे फुप्फुसावर दुष्परिणाम होतात. दमा, खोकला, सर्दीची अ‍ॅलर्जी अशा रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्याचबरोबर अक्युट ब्रॉन्कायटीसचेदेखील रुग्ण वाढले आहेत. म्हणजेच श्वसनविकार असलेले (अप्पर रेस्पिरेटरी संसर्ग) रुग्ण वाढले आहेत. म्हणून धुक्यात बाहेर पडण्याआधी मास्क घालून आणि उबदार कपडे घालून बाहेर पडावे’

पर्यावरणसंबंधित खटल्यांत पुणे न्यायपीठ देशात मागे

काय आहे ‘स्मॉग’?

‘स्मॉग’ म्हणजे हवेचे प्रदूषण असून, यामध्ये धूर आणि धुके एकत्र होते. सूर्यप्रकाशाशी नायट्रोजनच्या विविध ऑक्साईडची प्रक्रिया होते. त्याद्वारे ‘स्मॉग’ तयार होतो. यामध्ये औद्योगिक धूर, वाहनांचा धूर, कार्बनडायऑक्साईड, कार्बन मोनोक्साईड, सल्फर मोनोक्साईड हे सर्व असतात. हा शब्दप्रयोग प्रथम 19 व्या शतकात 1952 च्या सुमारास मेक्सिको शहरात वापरला गेला.

इथेनॉल पुरवठ्यांतून देशातील कारखान्यांना मिळाले तब्बल 20 हजार कोटी रुपये

‘‘असे हवामान पीक, मनुष्य आणि प्राण्यांसाठी अत्यंत घातक आहे. या हवामानामुळे पिकांवर विविध प्रकारची रोगांची पैदास होते. यात सर्वाधिक धोका फळभाज्या व वेलवर्गीय भाज्या यांच्यावर होतो; तसेच द्राक्षावर रोग वाढतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनावरांना घटसर्प होतो. शेळया-मेंढयांना सर्वाधिक धोका या वातावरणात वाढतो. माणसांना सर्दी, खोकला, पडसे व अशक्तपणा येतो.’’
                                                                                                                      – डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ

‘‘स्मॉगमध्ये फिरायला गेल्याने श्वसनविकाराचे रुग्ण वाढले आहेत. हा स्मॉग सुटीच्या दिवशी कमी दिसतो. कारण वाहनांची वर्दळ कमी असते आणि धुराचे उत्सर्जन कमी होते. जर कोरडा खोकला येणे, सतत शिंका, छातीत घट्टपणा वाटत असेल, खोकताना कफ पडत असला, तर श्वसनविकार तज्ज्ञांना दाखवा. धुक्यामुळे कोरोनाचाही धोका वाढल्याचे दिसून आलेले आहे.’’

                                                                                                                 – डॉ. अपर्णा बिराजदार, फुप्फुसविकारतज्ज्ञ

म्हाडा पेपरफुटी प्रकरण : उत्तरपत्रिका कोरी ठेवण्याचा सल्ला

धुक्यात जाताना ही घ्या काळजी

 

Back to top button