बारामती ः पुढारी वृत्तसेवा : बारामती सहकारी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी (Baramati Bank) राष्ट्रवादी काॅंग्रेसने त्यांच्या सहकार प्रगती पॅनेलमधील उमेदवारांची यादी आज (दि. ७)जाहीर केली. पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी राष्ट्रवादी भवनामध्ये ही यादी जाहीर केली. १५ जागांपैकी जुन्या संचालक मंडळातील आठ जणांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. नवीन सात चेहरे पॅनेलमध्ये घेण्यात आले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी यासंबंधी मेळावा घेत मंगळवारी यादी जाहीर केली जाणार असल्याचे सांगितले होते. त्यांनी उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यावर होळकर यांनी ही यादी जाहीर केली.
सर्वसाधारण मतदारसंघातून सचिन सदाशिव सातव, मंदार श्रीकांत सिकची, रणजित वसंतराव धुमाळ, जयंत विनायकराव किकले, नुपुर आदेश वडूजकर-शहा, देवेंद्र रामचंद्र शिर्के, डाॅ. सौरभ राजेंद्र मुथा, किशोर शंकर मेहता, ॲड. शिरीष दत्तात्रय कुलकर्णी, नामदेवराव निवृत्ती तुपे
महिला राखीव गटातून कल्पना प्रदीप शिंदे, वंदना रमेश पोतेकर, भटक्या विमुक्त जाती-जमाती विशेष मागास प्रवर्गातून उद्धव सोपानराव गावडे, इतर मागास प्रवर्गातून रोहित वसंतराव घनवट तर अनुसुचित जाती जमाती गटातून विजय प्रभाकर गालिंदे यांना संधी देण्यात आली आहे.
यापैकी सातव, शिर्के, तुपे, शिंदे, पोतेकर, गावडे, गालिंदे यांनी यापूर्वीच्या संचालक मंडळात काम पाहिले आहे. नुपुर वडूजकर-शहा या स्विकृत संचालक म्हणून बॅंकेत प्रतिनिधित्व करत होत्या. त्यामुळे जुन्या संचालक मंडळातील आठजणांना पुन्हा संधी मिळाली आहे. बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष श्रीकांत सिकची यांच्याएेवजी त्यांचे चिरंजीव मंदार यांना संधी देण्यात आली आहे.
हेही वाचलं का?