Hingoli Stones Throwing : कळमनुरी आगारातून निघालेल्या बसवर दगडफेक; प्रवासी सुखरूप

Hingoli Stones Throwing : कळमनुरी आगारातून निघालेल्या बसवर दगडफेक; प्रवासी सुखरूप
Published on
Updated on

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा

कळमनुरी आगारातून सोडण्यात आलेल्या कळमनुरी-परभणी या बसवर हिंगोली जवळ डिग्रस पाटी येथे शेतातून आलेल्या दोन ते तीन जणांनी आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दगडफेक केली. (Hingoli Stones Throwing) यामध्ये बसच्या समोरच्या काचाचे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

एसटी कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप सुरु आहे. या संपात हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत व कळमनुरी आगारातील चालक, वाहक व काही कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे एसटीची सेवा विस्कळीत झाली आहे.

दरम्यान, आज कळमनुरी आगारातून दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कळमनुरी ते परभणी ही बस (एमएच-१४-बीटी-००५८) सोडण्यात आली. या बसमध्ये कळमनुरी येथून चार प्रवासी तर हिंगोली येथून सहा प्रवासी बसले होते. (Hingoli Stones Throwing)

ही बस हिंगोली बसस्थानकातून निघाल्यानंतर हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावर डिग्रस पाटीजवळ शेतातून आलेल्या तिघांनी बसवर दगडफेक करण्यास सुरूवात केली.

या प्रकारामुळे चालक, वाहकासह प्रवासीही गोंधळून गेले. चालकाने बस थांबवल्यानंतर दगडफेक करणारे तिघेही पळून गेले. यामध्ये बसचा समोरील काच फुटल्याने नुकसान झाले.

मात्र सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. (Hingoli Stones Throwing)

त्यानंतर चालकाने या घटनेची माहिती कळमनुरी आगाराला कळवून बस जागेवरच थांबवली.

या घटनेची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक मळघने, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल भडंगे, जमादार संतोष वाठोरे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

त्यानंतर पोलिस बंदोबस्तात सदर बस हिंगोली आगारात आणण्यात आली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news