ज्येष्ठ नेते आप्पासाहेब जगदाळे यांना मातृशोक | पुढारी

ज्येष्ठ नेते आप्पासाहेब जगदाळे यांना मातृशोक

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ नेते आप्पासाहेब जगदाळे यांच्या मातोश्री सुशीलाबाई नानासाहेब जगदाळे (वय ९२, रा. सराटी, ता. इंदापूर) यांचे वृद्धपकाळाने गुरुवारी (दि. १४) निधन झाले. त्यांच्या मागे ४ मुले, ४ मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा स्वभाव अंत्यत शांत व मनमिळाऊ वृत्तीचा होता.

त्या काकी म्हणून परिचित होत्या. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे, सराटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भारत जगदाळे, महाराष्ट्र बँकेचे निवृत्त शाखाधिकारी प्रकाश जगदाळे व इंदापूर पंचायत समितीचे माजी सदस्य प्रदिप जगदाळे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या अंत्यविधीला सर्वच क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button