पिंपरी : पतीकडून पत्नीच्या डोक्यात पाटा घालून निर्घृण खून | पुढारी

पिंपरी : पतीकडून पत्नीच्या डोक्यात पाटा घालून निर्घृण खून

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

घरगुती वादातून झालेल्या वादात पतीने पत्नीच्या डोक्यात पाटा घालून निर्घृण खून केला. ही घटना नेहरुनगर, पिंपरी येथे सकाळी उघडकीस आली असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. जिनाब अजमुद्दीन चाकोरे (वय ३५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती अजमुद्दिन अल्लाउद्दीन चाकोरे (३८, रा. नेहरूनगर, पिंपरी) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत जिनाब आणि आरोपी अजमुद्दीन यांच्यात मागील काही दिवसांपासून घरगूती कारणावरून वाद सुरू होते. या वादातून आरोपी पतीने मंगळवारी (दि. २३) सकाळी जिनाब यांच्या डोक्यात पाटा घालून पत्नीचा खून केला. याबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जिनाब यांना पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांया मृत्यू झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले. या घटनेबाबत पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचलं का?

पाहा व्हिडिओ : टाऊन हॉल : कोल्हापुरचं जगप्रसिद्ध वास्तूवैभव

 

Back to top button