पुणे जिल्ह्यातील 37 ग्रा.पं.बिनविरोध | पुढारी

पुणे जिल्ह्यातील 37 ग्रा.पं.बिनविरोध

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात 231 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून, त्यातील 37 ग्रामपंचायती बिनविरोध ठरल्या आहेत. 10 ग्रामपंचायतींसाठी एकही अर्ज आलेला नाही. त्यामुळे आता 184 ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि. 5) मतदान होणार आहे. निवडणुकीचा प्रचार शुक्रवारी सायंकाळी थंडावला. या निवडणुकीत 2 हजार 42 ग्रामपंचायत सदस्यांसाठी निवडणूक जाहीर झाली, त्यातील 851 सदस्य बिनविरोध विजयी झाले. 59 जागांसाठी एकही अर्ज आलेला नाही. त्यामुळे 1 हजार 132 सदस्यांसाठी रविवारी मतदान होणार आहे.

जिल्ह्यातील 231 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. त्यानुसार 16 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. रविवारी मतदान असून, लगेच सोमवारी मतमोजणी तालुक्याच्या ठिकाणी होईल. 231 ग्रामपंचायतींमधील दोन हजार 42 सदस्यांपैकी 59 ठिकाणी एकही अर्ज दाखल झाला नाही.

उमेदवारी अर्ज माघारीनंतर 851 सदस्यांच्या जागा बिनविरोध निघाल्या. त्यामुळे आता प्रत्यक्षात 1 हजार 132 जागांसाठीच मतदान होणार आहे, तर 37 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. सरपंच थेट मतदारांतून निवडला जात असून, तीन ग्रामपंचायतींमध्ये एकही अर्ज आलेला नाही. तर उमेदवारी अर्ज माघारीनंतर 49 सरपंच बिनविरोध निघाले. त्यामुळे प्रत्यक्षात 179 सरपंचपदांसाठी मतदान होणार आहे.

हेही वाचा

Pune News : पुणेकर मुलीचे डच भाषेत पाठ्यपुस्तक

Pimpri News : पिंपळे गुरव येथे मैलामिश्रित पाणी रस्त्यावर

Pimpri News : क्षयरोग कंत्राटी अधिकारी-कर्मचार्‍यांचा संप

Back to top button