Pimpri News : क्षयरोग कंत्राटी अधिकारी-कर्मचार्‍यांचा संप | पुढारी

Pimpri News : क्षयरोग कंत्राटी अधिकारी-कर्मचार्‍यांचा संप

आकुर्डी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आकुर्डी येथील दवाखान्यात आरोग्यसेवा बजावत असलेल्या कंत्राटी वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांनी शासन सेवेत समायोजन करण्याच्या मागणीसाठी 3 नोव्हेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. 25 ऑक्टोबरपासून तसे हे आंदोलन राज्यभर सुरू झाले आहे. त्यात आता आकुर्डी येथील वैद्यकीय कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला. या संपामुळे आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे.

क्षयरोग विभागात गेली 20 वर्षांपासून विविध पदांवर एकूण 46 अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये क्षयरोगसारख्या अतिसंसर्गजन्य रोगामध्ये प्रत्यक्षरित्या कामकाज करत असताना शासनाकडून त्यांना अत्यंत तुटपूंजे मानधन देण्यात येते. बेमुदत आंदोलनानुसार बिनशर्त समायोजन झालेच पाहिजे व जोपर्यंत समायोजन होत नाही, तोपर्यंत ‘समान काम समान वेतन’ मिळण्याबाबत लेखी स्वरूपात सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत ‘काम बंद’ आंदोलन चालू ठेवण्याचे निवेदन महापालिका अतिरिक्त आयुक्त यांना देण्यात आले आहे.

एकच नारा कायम करा.

महापालिकेच्या आरोग्य कर्मचार्‍यांनी एकच नारा कायम करा… अशा घोषणा देत शासनाचे लक्ष वेधून घेतले.
महापालिका आरोग्य कर्मचार्‍यांना रुग्णांचे टार्गेट महापालिकेच्या आरोग्य कर्मचार्‍यांना वर्षाचे रुग्ण टार्गेट 3100 देण्यात आले आहे. त्यापैकी 2368 रुग्ण आहेत. कोवीड काळात त्यांनी जिवाची, कुटुंबाची पर्वा न करता शंभर टक्के क्षयरोग विभागात आपले योगदान दिले आहे. कोवीड काळात बर्‍याच कर्मचार्‍यांना कोवीडची लागणदेखील झाली होती. तरीही न डगमगता त्यांनी आपले काम चोखपणे केले.

  • विनाशर्त समायोजन करण्याची मागणी; आरोग्य सेवेवर परिणाम
  • आकुर्डी रुग्णालयात शुक्रवारपासून सुरू झाले राज्यव्यापी आंदोलन
  • महागाईमुळे किमान गरजादेखील भागवता येणे शक्य नसल्याने क्षयरोग विभागात काम करणार्‍या सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचार्‍यांनी रिक्त असलेल्या पदावर विनाशर्त समायोजन करून राज्याप्रमाणे शासन स्तरावर किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्तरावर कायम करण्याबाबत लेखी स्वरुपात सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत दि. 3 नोव्हेबरपासून बेमुदत राज्यव्यापी आंदोलनात सहभागी झाल्याचे पत्र या अधिकारी कर्मचार्‍यांनी दिले आहे. तर होणार्‍या नुकसानीस कर्मचारी जबाबदार राहणार नसल्याचे त्यात नमूद केले आहे.
  •  आरोग्यमंत्री यांनी मागील आठ महिन्यांपासून अभियानातील कर्मचारी यांच्या समायोजन प्रक्रियेसाठी अभ्यास समिती गठित केली असतानाही अद्याप त्याचा निर्णय नाही, परिणामी महानगरपालिका क्षयरोग अधिकारी व कर्मचारी कामकाज बंद आंदोलनात सहभागी होत असल्याचे राज्य आरोग्य कर्मचारी संघटनेने निवेदन दिले आहे. या आंदोलनामध्ये डॉ. सुधीर दहिठनकर, सूरज कांबळे, चंद्रशेखर सरवदे, वैशाली चासकर यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी आहेत.

हेही वाचा

Maratha Reservation : सरकारचा नवा जीआर जरांगे-पाटील यांनी स्वीकारला; पात्र व्यक्तींना मिळणार कुणबी प्रमाणपत्र

संगोपन : पालक मीटिंगचे महत्त्व ओळखा

प्लूटोवर बर्फाचा फवारा करणारा ज्वालामुखी

Back to top button