Traking : सात वर्षीय हिमांकने केले १०१ किल्यांवर ट्रेकिंग | पुढारी

Traking : सात वर्षीय हिमांकने केले १०१ किल्यांवर ट्रेकिंग

राजगुरूनगर, पुढारी वृत्तसेवा :

येथील सात वर्षीय हिमांक ढवळे या चिमुरड्याने १०१ किल्ल्यांवर ट्रेकींग (Traking) केले आहे. ३० ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर या दहा दिवसात त्याने आई, वडील व लहान भावासह ४६ किल्ल्यांवर भ्रमंती करून नवीन विक्रम प्रस्थापीत केला आहे. यामध्ये गोवा, सिंधुदुर्ग, मालवण, रत्नागिरी आणि अलिबाग मधील तब्बल ४३ जलदुर्गांचा समावेश आहे.

राजगुरूनगर येथील हिमांक पराग ढवळे या चिमुरड्याला वयाच्या चौथ्या वर्षीपासून ट्रेकींगची आवड लागली. त्याचे आजोबा व प्रतिष्ठीत डॉक्टर मारूती ढवळे व आजी मंदाकिनी यांनी एकुण २५० किल्ले व १००० पेक्षा जास्त ट्रेक (Traking) केले आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेत हिमांकने २६ जानेवारी २०१८ रोजी पहिला दौलताबाद किल्ला हा ट्रेक केला.त्यानंतर हिमांकला ट्रेकींगची आवड निर्माण झाली. त्यानंतर दर शनिवार व रविवारी तो आजी-आजोबा व आई-वडीलांबरोबर नियमित ट्रेकला जाऊ लागला.

४३ जलदुर्ग, ६ भुईकोट व ५२ गिरीदुर्ग

हिमांकने आतापर्यंत ४३ जलदुर्ग, ६ भुईकोट व ५२ गिरीदुर्ग केले आहेत. यामध्ये साल्हेर-सालोटा, हरगड, मोरोशीचा भैरवगड, खिळ्यांच्या वाटेने हडसर हे अवघड किल्ले सर केले आहेत. हिमांकबरोबर त्याचा अडीच वर्षांचा लहान भाऊ आयांश यानेही ६३ किल्ल्यांची सफर अनुभवली आहे. (Traking)

हिमांकने महाराष्ट्रातील सर्व किल्ले सर करण्याचा मानस व्यक्त केला आहे. सध्या त्याची कामगिरी पाहता तो ट्रेकींग मधील अनोखे विक्रम करण्याच्या मार्गावर आहे. किल्ल्यांची माहिती मिळवणे, ऎतिहासिक पुस्तके वाचणे व ट्रेकींगची (Traking) तयारी करणे या गोष्टींमध्ये हिमांकला आवड आहे. सह्याद्रीतील किल्ले झाल्यानंतर हिमालयीन ट्रेक करण्याची इच्छा हिमांकने बोलून दाखवली आहे. (Traking) लहान वयापासूनच हिमांक करतअसलेली कामगिरी पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

हेही वाचलं का? 

व्हिडिओ पहा : माझ्या पतीला निलंबनाची नोटीस आली, आता सकाळपासून ते फोनच उचलत नाहीत

हे पण वाचा :

Back to top button