न्यायालयात खासगी कामासंदर्भात आलो आहे. मात्र, इथे बसायला जागा नाही, तसेच पुरेशी हवाही नसल्याने कोंडल्यासारखे वाटत आहे. त्यामुळे खाली येऊन कट्ट्यावर बसलो आहे.– विकास कांबळे, पक्षकारमोकळ्या जागेत कक्ष उभारणीमुळे न्यायालयातील हवेचे गणित बिघडले आहे. कोर्टरूममधील कागदपत्रे व कपाटांसाठी एक रूम तयार करून त्या ठिकाणी कोर्टनुसार विभाग करून तेथे ठेवल्यास जागा मोकळी होऊन सर्व खिडक्या उघड्या करता येतील. सध्या न्यायालयात जागा अपुरी असली तरी न्यायालयीन घटकांचाही विचार होणे आवश्यक आहे.– अॅड. रणजित हांडे, फौजदारी वकील