कोल्‍हापूर : शिंपे गावची विद्यार्थिनी सिद्धी पाटीलची इस्रो आणि नासा अभ्‍यास भेटीसाठी निवड!

सिद्धी पाटीलची इस्रो अभ्‍यास भेटीसाठी निवड
सिद्धी पाटीलची इस्रो अभ्‍यास भेटीसाठी निवड

सरूड : पुढारी वृत्तसेवा शाहूवाडी तालुक्यातील शिंपे गावची विद्यार्थिनी कु. सिद्धी भीमराव पाटील हिची इस्रो (बंगळुरु) आणि नासा (अमेरिका) येथे अंतराळ संशोधन विषय अभ्यास भेटीसाठी निवड झाली आहे. सिद्धी पाटील ही सद्या रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथील छत्रपती शिवाजी आदर्श विद्या मंदीर (नं.४) या प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीत शिकत आहे.

रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाने घेतलेल्या निवड परीक्षेतून निवडलेल्या २० मुलांमध्ये कु. सिद्धी हिने स्थान मिळविले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्था नासा येथे अभ्यास भेटीसाठी ती रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

याआधीही तीने ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. या निवडीनिमित्त शिंपे गावात नातेवाईक आणि ग्रामस्थांनी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. कु. सिद्धी हिला मुख्याध्यापक संभाजी पाटील, वर्गशिक्षक श्रीकांत शिंदे, आई-वडील, आजी-आजोबा यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news