Crime News : व्यापार्‍याला लुटणार्‍या सराईतासह चारजण जेरबंद | पुढारी

Crime News : व्यापार्‍याला लुटणार्‍या सराईतासह चारजण जेरबंद

पिंपरी :वृत्तसेवा : दुचाकीवरून जाणार्‍या व्यापार्‍याला धक्का देऊन खाली पडून त्याच्याकडील 14 लाख रुपये लुटून नेणार्‍या चार आरोपींना वाकड पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण 11 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सुहास नवनाथ जोगदंड (22, रा. पिंपरी), आदित्य संतोष घायतडक (21, रा. पिंपरी), अमन आजिम शेख (20, रा. पिंपरी), गणेश भुंगा कांबळे (21, रा. काळेवाडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.पिंपरीतील होलसेल कापड दुकानदार मोहनदास सिरुमल तेजवाणी (62, रा. काळेवाडी) हे 18 ऑक्टोबर रोजी दुकानातील 14 लाखांची रोकड घेऊन जात होते. दरम्यान, दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी तेजवानी यांच्या दुचाकीला धक्का दिला. त्यामुळे ते खाली पडले.

आरोपींनी त्यांच्याकडील रोकड असलेली बॅग हिसकावून पळ काढला. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून त्यांची माहिती काढली असता आरोपी सुहास व आदित्य यांची नावे समोर आली. त्यानुसार, पोलिसांनी काळेवाडी परीसरातून दोघांनाही ताब्यात घेतले.

दोघांना अटक करताच त्यांचे साथीदार अमन व गणश हे फोन बंद करून पसार झाले. पोलिसांनी तांत्रिक तपास करत त्या दोघांनाही ताब्यात घेतले. चारही आरोपींकडून पोलिसांनी चोरीला गेलेल्या रकमेतून 10 लाख 40 हजार रुपये व दुचाकी असा 11 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड, विठ्ठल साळुंखे, सहायक पोलिस निरीक्षक संतोष पाटील, सचिन चव्हाण, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे यांनी ही
कामगिरी केली.

हेही वाचा

मामुर्डी-सांगवडे पुलाचा खर्च 15 वरून 50 कोटींवर

Crime news : जुगाराच्या नादासाठी चोरले अकरा लाखांचे लॅपटॉप

Pune News : समान पाणीपुरवठा योजनेला मिळेना गती

 

Back to top button