

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार पुण्याहून नाशिकला एका कार्यक्रमाला जात असताना बिघाड झाल्याची माहिती आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक दौरा रद्द झाला आहे.
हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे दौरा रद्द झाला आहे. नाशिकनंतर अजित पवारांचा अहमदनगर दौरा होता. सकाळी सव्वा दहा वाजता अजित पवार नाशिकला पोहचणार होते. मात्र, हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आला असल्याची माहिती आहे.
हेही वाचा