Lalit Patil : ललित पाटील सुरुवातीपासूनच करीत होता ‘ड्रामा’ | पुढारी

Lalit Patil : ललित पाटील सुरुवातीपासूनच करीत होता ‘ड्रामा’

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : चाकण परिसरातील शेल पिंपळगाव येथील एका ढाब्यावर ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या पाच जणांना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी अटक केली. ऑक्टोबर 2020 मध्ये ही कारवाई करण्यात आली. या रॅकेटची एक कडी ललित पाटील असल्याचे पोलिस तपासात उघड झाल्याने त्यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

पोलिस कोठडीत असताना ललित पाटील याने ससून हॉस्पिटलच्या कैदी वॉर्डमध्ये राहण्यासाठी हिंजवडी पोलिस ठाण्याच्या जिन्यावरून पडण्याचे नाटक केले होते. त्यानंतर पुन्हा पोटात दुखत असल्याचे सांगून तो ससून रुग्णालयात भरती झाला. दरम्यान, चार महिन्यांपूर्वी पाटील याने जामिनासाठी अर्ज केला होता. त्या वेळी पिंपरी – चिंचवड पोलिसांनी पाटील आजारपणाचे ढोंग करीत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते.

हेही वाचा

मार्ग मोकळा! पिंपरी ते निगडी मेट्रो लवकरच धावणार

Rohit Pawar : मराठा आरक्षणावर राजकारण करू नका : आमदार रोहित पवार

पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्तारुंदीकरण सुकर

Back to top button