Income Tax Department : पुण्यातील प्रसिद्ध ज्वेलर्सच्या दुकानांवर छापे; आयकर विभागाची मोठी कारवाई

Income Tax Department : पुण्यातील प्रसिद्ध ज्वेलर्सच्या दुकानांवर छापे; आयकर विभागाची मोठी कारवाई

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुण्यातील नारायण पेठे परिसरातील एका प्रसिद्ध सराफी पेढीवर प्राप्तिकर विभागाने गुरुवारी सकाळी छापे टाकले. या कारवाईत प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही कागदपत्रे ताब्यात घेतली असून सराफी पेढीतील गेल्या वर्षभरातील व्यवहारांची माहिती अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली आहे. गुरुवारी पहाटेपासूनच प्राप्तिकर विभागाचे पथक पेढीवर मोठा फौजफाटा घेऊन दाखल झाले असून अद्याप ही कारवाई सुरूच आहे. आज सकाळपासूनच प्राप्तीकर विभागाचे तब्बल 40 अधिकाऱ्यांकडून ही छापेमारी सुरु झाल्यामुळे सराफ व्यावसायिकात मोठी खळबळ उडाली आहे.

पुण्यातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिकांवर छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये हडपसर, पत्र्या मारुती चौक, बाणेर परिसरातील सराफी पेढींचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. या कारवाईत महत्वाचे कागदपत्रे तसेच इलेक्ट्रॉनिक डाटा जप्त करण्यात आला आहे. संबंधित पुण्यातील मोठे ज्वेलर्स दुकानात मागील वर्षभरातील आर्थिक व्यवहारांत गैरप्रकार आढळल्याची माहिती प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार गुरवारी सकाळ पासून ही छापेमारी सुरू करण्यात आली आहे. मात्र या कारवाई बाबत आयकर विभागाने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news