Pudhari Kasturi Club : कस्तुरी लुटणार दांडिया-गरबाचा आनंद; नवरात्रोत्सवानिमित्त उद्या खास उपक्रम | पुढारी

Pudhari Kasturi Club : कस्तुरी लुटणार दांडिया-गरबाचा आनंद; नवरात्रोत्सवानिमित्त उद्या खास उपक्रम

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नवरात्र उत्सवात दांडिया-गरबाचे कार्यक्रम हे आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. या पार्श्वभूमीवर दै. पुढारी कस्तुरी क्लब आणि सोसायटी चहा प्रस्तुत, तसेच मेदोरा आणि स्टार प्रवाहच्या वतीने जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रम शुक्रवारी (दि.20) आयोजित केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून खास कस्तुरींसाठी महाभोंडला आणि दांडिया-गरबा आयोजित केला असून या कस्तुरी सदस्यांनाही सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

कर्वेनगर येथील काकडे पॅलेस येथे सायंकाळी चार ते रात्री आठ या वेळेत होणार्‍या या महाभोंडलामध्ये स्टार प्रवाह वाहिनीवरील पिंकीचा विजय असो मालिकेतील कलाकार विजय आंदलकर आणि आरती मोरे सहभागी होणार आहेत. यानिमित्ताने कस्तुरींना त्यांच्याशी संवाद साधता येणार आहे. दै. पुढारी कस्तुरी क्लबकडून महिलांना विविध कार्यक्रमांत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. एकापेक्षा एक अनेक कार्यक्रमांची मेजवानीच मिळत असल्याने महिलांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून कस्तुरी क्लबने वेगळी ओळख निर्माण केलेली आहे.

सध्या नवरात्र उत्सव सुरू असल्याने दांडिया-गरबाचा आनंद महिलांना घेता येणार आहे. यामध्ये महाभोंडला तसेच मनसोक्त दांडिया-गरबा खेळण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी सोसायटी चहा आणि मेदोरा कॅप्सूल हे मुख्य प्रायोजक आहेत. तर, स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रसिद्ध कलाकारांना भेटण्याची, संवाद साधण्याची संधीही कार्यक्रमात घेता येणार आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व महिलांना ‘सोसायटी चहा’कडून चहा दिला जाणार आहे.

तसेच, एन. जी. बराटे एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका संगीता बराटे यांच्याकडून महिलांना भोंडल्याची खिरापत देण्यात येणार आहे. सहभागी सर्व महिलांनी घागरा किंवा गुजराती साडी परिधान करून यावे. उपस्थित महिलांमधून बेस्ट ड्रेपरी केलेल्या विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. कार्यक्रमस्थळी सभासद नोंदणी केली जाणार
आहे. अधिकाधिक कस्तुरींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन दै. पुढारी कस्तुरी क्लबतर्फे करण्यात आले आहे.

‘सोसायटी चहा’ सोबतचे आठवणीतील क्षण कस्तुरींचे

असा कोणता एक क्षण जो चहा घेताना तुमच्या सोबत घडला आणि तो क्षण अविस्मरणीय प्रसंग ठरला. प्रसंग लिहून पाठवा. हा प्रसंग 50 शब्दांत लिहावा. हे लेखन व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवायचे आहेत. आपल्या लेखनाबरोबर आपले नाव आणि फोन नंबर लिहिणे आवश्यक आहे. लेखन पुढील क्रमांकावर 7972252835 (हा नंबर फक्त लिखाण पाठविण्यासाठी आहे) पाठवावेत. विजेतीला सोसायटी चहाकडून गिफ्ट हॅम्पर मिळणार आहे. याशिवाय, रोजच्या गतिमान जीवनात स्वतःला फीट ठेवणारी कस्तुरींसाठी मेदोरा क्वीन स्लिम ट्रिम कस्तुरी 2023 ही स्पर्धा घेतली जाणार आहे. उपस्थित कस्तुरींमधून मऑन द स्पॉटफ विजेते घोषित होणार आहेत. यामधील विजेतीला शेवानी साडीजकडून सुंदर आकर्षक साडी बक्षिस मिळणार आहे.

शेवानी सारीजची साडी जिंकण्याची संधी

कार्यक्रमाला उपस्थित कस्तुरींमधून आकर्षक वेशभूषा असलेल्या महिलेची निवड केली जाणार असून, त्या विजेत्या महिलेला शेवानी सारीजकडून आकर्षक साडी बक्षीस दिली जाणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील पिंकीचा विजय असो या मालिकेतील युवराजची भूमिका साकारणारे विजय आंदलकर आणि पिंकीची भूमिका करणार्‍या आरती मोरे हे कलाकार कस्तुरींच्या भेटीला येणार आहेत. हे कलाकार महाभोंडला आणि दांडिया – गरबामध्येही सहभागी होतील.

सभासद नोंदणीची शेवटची संधी

दै. ‘पुढारी कस्तुरी क्लब’ सभासद नोंदणीला या वर्षी महिलांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आता सभासद नोंदणी अंतिम टप्प्यात आली असून, सभासद होऊ इच्छिणार्‍या महिलांसाठी शेवटची संधी आहे. कस्तुरी क्लब सभासद शुल्क 600 रुपये असून, बॉस कंपनीचा काचेचे तीन बाऊल सेट भेट मिळणार आहे, तर सवलतींचे कूपन्स दिले जाणार आहेत. आजच सभासद व्हा आणि कस्तुरीसोबत वर्षभर आनंद लुटावा. अधिक माहितीसाठी 020-25003316 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Back to top button