स्वप्नवत प्रवासाला मिळणार चालना! | पुढारी

स्वप्नवत प्रवासाला मिळणार चालना!

गणेश खळदकर

पुणे : देशातील एका शहरापासून दुसर्‍या शहरात स्वप्नवत वेळेत पोहचण्याच्या विचार आता प्रत्यक्षात येणार आहे. त्यासाठीच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांकडून हायपरलूप तंत्रज्ञानाचे प्रोटोटाईप तयार करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाचे पेटंट घेण्याचे प्रयत्न सुरू असून भविष्यात भारतीय बनावटीच्या हायपरलूप तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. हायपरलूप हे हाय-स्पीड रेल्वे तंत्रज्ञान आहे. ज्याचे उद्दिष्ट कमी दाबाच्या व्हॅक्यूम ट्यूबमध्ये चुंबकीय उत्सर्जनाद्वारे लांब अंतरापर्यंतचा पल्ला गाठणे शक्य आहे. या तंत्रज्ञानामुळे प्रवासाचा वेळ अपेक्षेपेक्षा अनेक तासांनी कमी होऊ शकतो.

यामध्ये 1200 किलोमीटर प्रतितास वेगाने प्रवास शक्य होणार आहे. बोगद्यातील हवा संपूर्णपणे काढून घेतल्याने घर्षण अत्यंत कमी होते. ज्यातून हा वेग साधला जातो. जगात वेगवेगळी विद्यापीठे आणि कंपन्या यावर संशोधन करीत असून, वेगवेगळी तंत्रज्ञाने विकसित केली जात आहेत. दरवर्षी युरोपियन हायपरलूप वीकमध्ये हे सर्व एकत्र येऊन या तंत्रज्ञानावर चर्चा करतात. 2030 मध्ये युरोपातील दोन शहरे पहिल्यांदा हायपरलूपने जोडली जातील असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

एमआयटीच्या टीम वेगापॉड हायपरलूप यांनी इंग्लंडमधल्या एडिनबर्ग विद्यापीठात आयोजित युरोपियन हायपरलूप वीक 2023 मध्ये भाग घेत भारताचे प्रतिनिधित्व केले आणि त्यांनी तयार केलेल्या प्रोटोटाईपचे सादरीकरण केले. विकसित केलेल्या तंत्रज्ञानामध्ये एक यांत्रिक उपप्रणाली वैशिष्ट्यीकृत आहे. जिचा पुनर्वापर शक्य आहे. फ्लॅक्स फायबर सारख्या पर्यावरणास अनुकूल सामग्रीचा यात वापर केला आहे. सं

घाने निर्मिलेल्या यानात कॉन्टॅक्टलेस लॅटरल स्टॅबिलिटी सिस्टम, विशिष्ट न्यूमॅटिक्स ब—ेकिंग मेकॅनिझम आणि अत्यंत प्रगत आणि टिकाऊ इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल उपप्रणाली यासह अत्याधुनिक नवकल्पनांचा समावेश आहे. इतर संघांच्या तुलनेत कमी खर्चात पूर्ण कार्यक्षम यान निर्मिती एमआयटीच्या संघाने तयार केले. या यानाने सर्व कठोर चाचण्या आणि सुरक्षितता निकष टप्पे यशस्वीरित्या पार करून तज्ज्ञ परीक्षकांसमोर चाचणी ट्रॅकवर सादरीकरण करणारा एकमेव आशियाई संघ म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे.

25 हून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश

प्रा. डॉ. गणेश काकांडीकर यांच्या नेतृत्वात आणि संघाचे सल्लागार डॉ. ओंकार कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध अभियांत्रिकी शाखा आणि व्यवस्थापन पार्श्वभूमीतील 25 हून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या या संघाचे नेतृत्व कॅप्टन पूर्णेश जैन, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी चैतन्य सहस्रबुद्धे आणि संघ व्यवस्थापक शुभम गांधी यांनी केले. विद्या दाखविलेल्या टिम स्पिरिटमुळे या प्रकल्पाला यश मिळू शकल्याचे सांगत शिक्षकांनी त्यांचे कौतुक केले.

अत्यंत पर्यावरण पूरक अशा साहित्यांचा वापर करून विद्यार्थांनी नाविन्यपूर्ण हायपरलूप तंत्रज्ञान विकसित करून इंग्लंड मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. हे तंत्रज्ञान पूर्णपणे भारतीय बनावटीनवर आधारित असून याचे पेटंट मिळवण्यासाठी विद्यार्थी आणि विभाग प्रयत्नशील आहे.

– प्रा. डॉ. गणेश काकांडीकर, सहयोगी अधिष्ठाता, स्कूल ऑफ इंजिनीरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी एमआयटी डब्लूपीयु.

Back to top button