Pune Ncb Raid : पुण्यात माळरानावर एनसीबीची मोठी कारवाई; फिनेलच्या नावाखाली नशेचा कारभार

Pune Ncb Raid : पुण्यात माळरानावर एनसीबीची मोठी कारवाई; फिनेलच्या नावाखाली नशेचा कारभार
Published on
Updated on

शिक्रापूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातील डोंगराळ भागात दुष्काळी असलेल्या मिडगुलवाडीत एका बंदिस्त पत्राशेडवर कारवाई करत (एनसीबी) अमलीपदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली. येथे ड्रग्ज जप्त केल्याने निर्जन माळारानावरील बंदिस्त पत्राशेडचे रहस्य उलगडले आहे. या घटनेने केवळ सहामाही शेती व दुग्धव्यवसाय असलेल्या या छोट्याशा मिडगुलवाडीतील ग्रामस्थ भांबावले आहेत.(NCB)

येथील ग्रामस्थ कुतूहलापोटी पत्राशेडजवळ गेले असता त्यांना फरशी पुसण्यासाठी फिनेल उत्पादन होत असल्याचे सांगितले जात असे. या निमित्ताने मिडगुलवाडी, कान्हूर मेसाई, पाबळ या ठिकाणी निर्जन स्थळावर उभी राहिलेली असंख्य पत्राशेड हा विषय ऐरणीवर आला आहे. एनसीबीच्या पथकाने कमालीची गुप्तता पाळत येथे छापा टाकला. याबाबत शिक्रापूर पोलिसांनादेखील कल्पना नव्हती व कारवाईनंतरदेखील माहिती दिली गेली नव्हती. तब्बल 28 तास ही कारवाई सुरू होती.

घटनास्थळावरून सुमारे 174 किलो अल्प्राझोलम नामक ड्रग्ज व काही साहित्य जप्त करत या बेनाम कंपनीचे शेड व परिसर सील करण्यात आला आहे. हैद्राबाद येथील एका आरोपीकडून मिडगुलवाडी (ता. शिरूर) व नारायणगाव (ता. जुन्नर) हे ड्रग्ज कनेक्शन उघड झाल्याची माहिती मिळत आहे. जुन्नर व शिरूर येथे अल्प्राझोलमची बेकायदा निर्मिती होत असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती.
या कारवाईदरम्यान दोन जणांना ताब्यात घेण्यात आले. एनसीबीने केलेल्या कारवाईत शेकडो लिटर केमिकल दोन मोठ्या खड्ड्यात नष्ट करण्यात आले.(NCB)

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news