Vijay vaddetiwar : समृद्धी महामार्गाच्या कामात मोठा भ्रष्टाचार : विजय वडेट्टीवार यांचा आराेप | पुढारी

Vijay vaddetiwar : समृद्धी महामार्गाच्या कामात मोठा भ्रष्टाचार : विजय वडेट्टीवार यांचा आराेप

नागपूर पुढारी वृत्तसेवा : समृद्धी महामार्गावर पुन्हा  भीषण अपघात का झाला? त्याची कारणे शोधणे महत्वाचे आहे. समृद्धी महामार्गावर काम अर्धवट असतांना तो सुरू करण्याची घाई नको होती. सर्व सुविधा सुरू झाल्यानंतर हा रस्ता सुरू करण्याची गरज होती. आजही त्या मार्गावर रेस्ट रूम नाही, विश्रांती घेण्यासाठी सुविधा नाहीत, यामुळेच समृद्धी महामार्गाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला हे कोणी नाकारू शकत नाही. असा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. (Vijay vaddetiwar)

माध्यमातून टीका होऊनही समृद्धी महामार्गाचे काम घाई गडबडीत काम करण्यात आले. त्यामुळे निष्पाप लोकांचा बळी आज जात आहेत. हे अपघात सरकारच्या घाईमुळे होत आहेत. सदोष काम नाही, तांत्रिक अडचणी आहेत. समृद्धीची वाहतूक थांबवावी समृद्धीमार्ग सुरू ठेवायचा की नाही यावर विचार झाला पाहिजे, असेही ते म्‍हणाले.

मनोज जरांगे यानी सरकारला दिलेल्या इशाऱ्यावर बोलताना सरकारने वेळ देऊन फसवणूक का केली, सरकार समाजाला खेळवत ठेवण्याचे काम करत आहे. उद्या नागपुरात विदर्भातील सर्व ओबीसी संघटनाची ११ वाजता बैठक होणार आहे. यात ४० संघटना असणार आहेत. आरक्षण १० दिवसात देता येतं का? पुन्हा तोंडाला पान पुसली जात आहेत का? ही जबाबदारी सरकारची आहे. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देऊ नये, ही आमची मागणी आहे. मात्र, वारंवार भूमिका बदलणारे अनेक नेते तयार झालेले आहेत, असा टाेलाही त्‍यांनी लगावला.

Vijay vaddetiwar : सदावर्ते नेमका कोणाचा?

कुठली चाचणी करता येईल तर तेही करून पाहावे ,सदावर्ते नेमका कोणाचा?आरोप करण्यापेक्षा कोणाची भाषा बोलत आहे. सदावर्ते हे सरकारची भाषा बोलत आहे. सदावर्ते हे सरकारची, सत्ताधाऱ्यांची भाषा बोलत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विषय देवेंद्र फडणवीस यांनीच पुढे आणला होता; मग त्यावेळेस तुम्ही आश्वासन का दिलं हे त्यांनी आता सांगितलं पाहिजे. त्यांनी आश्वासन दिल्यामुळे आज हा समाज रस्त्यावर आला. त्याचवेळी आरक्षण देऊ शकत नाही. असं जर सांगितलं असते. तर आज हा एवढा विषय चिघळला नसता. असेही वडेट्टीवार यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले.

हेही वाचा 

 

 

Back to top button