Navratri 2023 : पुण्यातल्या बाजारपेठा गजबजल्या

Navratri 2023 : पुण्यातल्या बाजारपेठा गजबजल्या

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापनेसाठी लागणारे पूजा साहित्य व फुलांच्या खरेदीसाठी शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांतील बाजारपेठा गजबजून गेल्या आहेत. बाजारपेठेत सकाळपासून महिलावर्गाची विड्याची पाने, नारळ, परडी, घट, सप्तधान्य, माती आदी खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. रविवारी (दि. 15) घरोघरी तसेच सार्वजनिक स्वरूपात होणार्‍या घटस्थापनेसाठी लागणार्‍या साहित्याच्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमध्ये नवरात्रोत्सवाचा मोठा उत्साह दिसून येत होता.

शहरात मोठ्या उत्साहात पार पडणार्‍या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती भागातील मंडई, हुतात्मा बाबू गेनू चौक, शनिपार चौक परिसरात तात्पुरत्या स्वरूपात पूजा साहित्य, फुले, माती, घट विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहे. शनिवारी सकाळपासून या भागात पूजा परडी, घट, हळद, कुंकू, गुलाल, हळकुंड, गुलाबपाणी, समई वात, मंडपी, लाल वस्त्र, दोरा गुंडी, अत्तर, गोमूत्र, गंगाजल, कापूर, माती यांसह पूजा साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी झाली होती. सायंकाळनंतर मंडई परिसरातील गर्दी वाढली होती. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.

पूजा अन् पॅकेज किट…

देवीच्या पूजेसाठी आवश्यक असणार्‍या सर्व साहित्याचे बाजारात तयार किट मिळत आहे. सुमारे पाचशे रुपयांपासून हे किट उपलब्ध असून, वेगळ्या वस्तूंची मागणी असल्यास त्यानुसार वेगळे पॅकेज दिले जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. दर वाढले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मागणी वाढली आहे.

बाजारात उपलब्ध झालेले साहित्य व त्यांचे दर पुढीलप्रमाणे

साहित्य           दर

परडी (मध्यम) 100 रुपये

घट (लहान जोडी) 60 रुपये

कुंकू (250 ग्रॅम) 50 रुपये

हळद (250 ग्रॅम) 80 रुपये

कापूर (250 ग्रॅम) 400 रुपये

लाल वस्त्र (1 मीटर) 80 रुपये

माती (1 किलो) 30 रुपये

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news