प्रश्न प्राथमिक आरोग्यसेवेचा!

प्रश्न प्राथमिक आरोग्यसेवेचा!
Published on
Updated on

दवाखाना, रुग्णालय किंवा उपचार केंद्रापर्यंत एखादा रुग्ण पोहोचतो तेव्हा त्याला मिळणार्‍या सेवेला आरोग्य सेवा म्हणतात. अर्थात, जोपर्यंत आपण खूप आजारी पडत नाही, तोपर्यंत स्वत:ला तंदुरुस्त मानत असतो. आपल्या सभोवताली दवाखान्यात जाण्यास टाळाटाळ करणारी अनेक मंडळी दिसतात. आजार किरकोळ असलल्याचे गृहित धरून ते दवाखान्यात जात नाहीत; पण ते त्याने त्रस्त असतात. असेही लोक आहेत की, ते आजारी असले, तरी त्यांच्यात ठळक लक्षणे दिसत नाहीत आणि ही लक्षणे काळानुसार वाढत जातात.

केरळ आणि तामिळनाडूमध्ये गेल्या पाच वर्षांतील आरोग्य स्थितीचा आढावा घेतला, तर धक्कादायक आकडेवारी समोर आलेली असते. मधुमेह असणार्‍या पुरुषांची संख्या दुप्पटीने वाढलेली असतानाही ते उपचार करत नाहीत. विशेष म्हणजे, अशा रुग्णांची संख्या 2015-16 मध्ये सहा ते सात टक्के होती, ती 2019-21 या काळात 12 ते 14 टक्क्यांवर पोहोचली आहे. यात निरंतर वाढ होत आहे. उत्तर भारतातील समृद्ध राज्यात 60 टक्क्यांपेक्षा अधिक महिला आणि मुले अ‍ॅनिमियाग्रस्त आहेत. ही मंडळी दवाखान्यात जाण्याबाबत उदासीन असतात. सुदैवाने आरोग्याबाबत आपण अधिक सजग झाल्यामुळे अ‍ॅनिमिया, उच्च रक्तदाब, मधुमेहासारखे गंभीर आजार आणि संसर्गजन्य आजारांवर कमी खर्चाच्या उपकरणांतून निदान आणि सहज उपलब्ध होणार्‍या औषधांमुळे उपचार करणे सुलभ झाले आहे.

उपचाराच्या नियमांतील स्पष्टता आणि रुग्ण व डॉक्टर यांच्यात फोनवरून संपर्क राहत असल्याने त्याचे प्रशिक्षण घेतलेला आरोग्य कार्यकर्ता हा बहुतांश प्रकरणात कशाची आवश्यकता आहे, हे शोधण्यासाठी मदत करू शकतो. अर्थात, आपल्यासमवेत काहीवेळा चुकीचे घडू शकते आणि हे मान्य करणे तसेच डॉक्टरांचा सल्ला योग्यरितीने पालन न करणे हा एक मोठा अडसर झाला आहे. या समस्येच्या निराकरणासाठी गेल्या पाच दशकांत ईराणसारख्या देशात अणि अमेरिकेच्या अलास्कासारख्या ग्रामीण राज्यात प्राथमिक पातळीवर आरोग्य देखभालीचे मार्ग पूर्णपणे बदलले आहेत. त्यांनी डॉक्टरांना सहायकाची भूमिका बजावण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या जागी प्रत्येक आरोग्य कार्यकर्त्याला एक गट सोपविला आहे. यानुसार तो समूहातील प्रत्येक सदस्याच्या आरोग्याची आणि कल्याणाची जबाबदारी पार पाडेल. दोन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर सरकार या कार्यकर्त्यांना सामुदायिक सेवेसाठी नियुक्त करते.

भारतातही अशा प्रकारच्या संघटना आहेत आणि त्यांनी याच द़ृष्टिकोनाचा वापर करून उच्च रक्तदाबाला नियंत्रित केले आहे. या मॉडेलला ज्या संघटनेने महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात लागू केले, त्या संघटनेने समुदायाबरोबर काम करताना स्थानिक आरोग्य कार्यकर्त्यांचाही एक गट तयार केला आणि त्यांना प्रशिक्षण दिले. निश्चित केलेले नियम आणि डॉक्टरांच्या पथकांच्या मदतीने आरोग्य सेवकांनी पावले उचलली आहेत. यावरून एक बाब स्पष्ट होते की, डॉक्टरांसह क्लिनिक मॉडेलला आता प्राथमिक आरोग्य उपचार केंद्र मानता येणार नाही. याउलट दर्जेदार प्राथमिक आरोग्य सुविधेत पूर्णपणे प्रशिक्षित आणि तांत्रिक रूपात सुसज्ज आरोग्येतर कर्मचारी सामील असतील आणि ते प्रसंगी डॉक्टरांचा सल्ला घेतील.

ही सुविधा गरजेनुसार उपकरणांचा, उपचारांचा उपयोग करण्यासाठी स्वतंत्र आहे आणि जेणेकरून त्यांच्या देखरेखीखाली असलेली लोकसंख्या ही निरोगी राहील. एखाद्या आरोग्य समस्येत वैद्यकीयद़ृष्ट्या काय करण्याची गरज आहे, हे निश्चित करणे आता सोपे झाले आहे; मात्र ते पूर्ण करणे हे वास्तवातील आव्हान आहे. भारतात उच्च माध्यमिक शिक्षणानंतर डिप्लोमा करणार्‍या युवकांची कमतरता नाही. हे तरुण आदिवासी समुदायात काम करण्यास, सेवा करण्यास तयार आहेत. त्यांना प्रशिक्षण देणे हे उपलब्ध मानवी स्रोतांचा संपूर्ण समुदायाचे आरोग्य राखणे आणि कल्याण करणे या द़ृष्टीने सक्षम उदाहरण म्हणून समोर आणण्याच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल असेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news