Sasoon Hospital Drug Racket : ससून ड्रग्जप्रकरणी सरकारला १० दिवसांनी जाग; चौकशीसाठी विशेष समिती

Sasoon Hospital Drug Racket : ससून ड्रग्जप्रकरणी सरकारला १० दिवसांनी जाग; चौकशीसाठी विशेष समिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ससून सर्वोपचार रुग्णालयात ड्रग्जप्रकरण आणि त्यातील आरोपी पळून गेल्यानंतर अखेर राज्य शासनाला दहा दिवसांनी जाग आली आहे. या घटनेबाबत सविस्तर चौकशी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीने सखोल चौकशी करून आपला सविस्तर अहवाल 15 दिवसांत शासनास सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने ससूनमधील प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्याचा शासन निर्णय बुधवारी जारी केला. उपसचिव प्रकाश सुरवसे यांच्या सहीने आदेश जारी करण्यात आले आहेत. चौकशी समितीमध्ये सदस्य म्हणून सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, नांदेडमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या न्यायवैद्यक शास्त्रविभागाचे प्रमुख डॉ. हेमंत गोडबोले, मुंबईतील ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालचे अस्थिव्यंगोपचार शास्त्रविभाग प्रमुख डॉ. एकनाथ पवार यांचा समावेश आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news