P-20 Conference : पी-२० परिषदेला सुरुवात; दिल्लीत जगभरातील संसद सदस्यांची हवामान बदल समस्यांवर होणार चर्चा

P-20 Conference : पी-२० परिषदेला सुरुवात; दिल्लीत जगभरातील संसद सदस्यांची हवामान बदल समस्यांवर होणार चर्चा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : जी-२० देशांच्या संसद अध्यक्षांची शिखर परिषद (पी-२०) दिल्लीत १३ आणि १४  ऑक्टोबरला होणार आहे. तत्पूर्वी गुरुवारी (१२ ऑक्टोबर) जगभरातील संसद सदस्य, शाश्वत जीवनशैली विकसित करण्यासाठी आणि हवामानातील बदलांना तोंड देण्यासाठी धोरणांवर चर्चा करण्यासाठी संसदीय मंचाच्या माध्यमातून एकत्र येणार आहेत.

नवीन संसद भवन परिसर आणि इंडिया इंटरनॅशनल कनव्हेन्शन एन्ड एक्स्पो सेंटर (आयआयसीसी) यशोभूमी अशा दोन ठिकाणी पी-२० परिषद होणार असून या वैश्विक परिषदेसाठी "एक पृथ्वी, एक परिवार एक भविष्यासाठी संसद" ही संकल्पना आहे. पर्यावरणानुकूल जीवनशैलीसाठी संसदीय मंचावर उद्या व्यापक मंथन होणार असून यासाठी ब्राझील, इंग्लंड, आफ्रिकन महासंघ, मेक्सिको, कोरिया प्रजासत्ताक, दक्षिण आफ्रिका, ओमान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांच्या संसदेचे प्रमुख दिल्लीत दाखल झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिखर परिषदेचे उद्घाटन १३ ऑक्टोबरला होईल. तर "एक पृथ्वी, एक परिवार एक भविष्यासाठी संसद" या संकल्पनेवर आधारीत पी-२० परिषदेच्या अध्यक्षस्थानी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला असतील. या परिषदेत होणाऱ्या चार सत्रांमध्ये सार्वजनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या मदतीने सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडविणे, महिलांच्या नेतृत्वाखाली विकास, शाश्वत विकास उद्दीष्टांच्या पूर्ततेला गती देणे आणि शाश्वत उर्जा परिवर्तन या विषयांवर मंथन होईल. यानंतर पी २० संयुक्त घोषणापत्र प्रकाशित करण्यात येईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news